नापास होण्याला पण काही तरी मर्यादा असते, पण पट्ट्या जिद्द हरला नाही; आएएस बनूनच अपयशाला हरवलं; अवनीश शरण यांचे ट्विट व्हायरल…

| Updated on: Jul 23, 2022 | 9:16 AM

मुंबईः माणसांच्या आयुष्यात नापास होण्याला आणि अपयशाला काही मर्यादा नसते, माणसाला अनेक वेळा आपापल्या अपयशाला सामोरं जावं लागतं, मात्र हेच नापास होणं अनेकदा माणसाला खूप काही शिकवून जातं, आणि हाच मुद्दा एका आएएस अधिकाऱ्याच्या लक्षात आला, छत्तीसगडचे आएएस अधिकारी अवनीश शरण (IASAwanish Sharan) यांनी एक ट्विट (Twit) केले आणि चर्चेत आले आहेत, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये […]

नापास होण्याला पण काही तरी मर्यादा असते, पण पट्ट्या जिद्द हरला नाही; आएएस बनूनच अपयशाला हरवलं; अवनीश शरण यांचे ट्विट व्हायरल...
Follow us on

मुंबईः माणसांच्या आयुष्यात नापास होण्याला आणि अपयशाला काही मर्यादा नसते, माणसाला अनेक वेळा आपापल्या अपयशाला सामोरं जावं लागतं, मात्र हेच नापास होणं अनेकदा माणसाला खूप काही शिकवून जातं, आणि हाच मुद्दा एका आएएस अधिकाऱ्याच्या लक्षात आला, छत्तीसगडचे आएएस अधिकारी अवनीश शरण (IASAwanish Sharan) यांनी एक ट्विट (Twit) केले आणि चर्चेत आले आहेत, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी 13 वेळा नापास झालोय, त्यानंतर यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) क्रॅक केली आहे.

 

सलग 13 वेळा नापास

कधी कधी नापास होण्यालाही मर्यादा असतात, मात्र एक व्यक्ती एकदा नाही दोनदा नाही तर सलग 13 वेळा नापास झाली आहे, मात्र ते कधी हिम्मत हरले नाहीत, प्रत्येक अपयशामध्ये आपलं यश शोधत राहिले, नव्या हिमतीने आपल्या ध्येयाचा पाठलाग करत राहिले. म्हणूनच एक दिवस ते लोकसेवा आयोगाची म्हणजेच यूपीएससीची परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि आयएएस होऊन आपल्या यशाला चमकवून दाखवले.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, आपण कधी कधी आणि कोणत्या क्षणी नापास होऊन अपयश आले आहे त्यांचे तेच ट्विट आता प्रचंड व्हायरल झाले आहे.

 

अपयशी माणसांसाठी प्रेरणादायी

अवनीश शरण यांच्या त्या ट्विटला अनेक यूजर्सनी आपलेही अनुभव जो़डले आहेत. त्यामध्ये अनेक लोकांनी त्यांचे हे ट्विट म्हणजे प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. जी लोकं वेगवेगळ्या परीक्षेत नापास होतात, ज्यांच्या पदरी अपयश आले आहे, त्यांच्यासाठी हे ट्विट म्हणजे एका नव्या आशेचा किरण आहे.

 

दहावी अवघे 44 टक्के मिळाले

आयएएस अवनीश शरण हे 2009 च्या बॅचमधील छत्तीसगड कॅडरचे अधिकारी आहेत. अवनीश शरण दरवेळी एक नवं ट्विट करत असतात, त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते. यावेळी मात्र त्यांनी आपल्याच वाट्याला आलेलं अपयश आणि त्याच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले आहे की, मी 13 वेळा नापास झालो आहे, आणि तेरा वेळा नापास झाल्यानंतर मला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले आहे.
अवनीश शरण यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांना मिळालेल्या परीक्षेतील टक्केवारींचीही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, दहावीमध्ये 44.7, बारावीमध्ये 65 टक्के आणि पदवीला 60 टक्के गुण पडले होते, मात्र अवनीश शरण यांनी दुसऱ्यांदा युपीएससीची परीक्षा दिली होती, त्यावेळी भारतात त्यांची रँक 77 होती.

दहावीचं मार्कलिस्टही व्हायरल

अवनीश शरण चर्चेत आले ते त्यांच्या दहावीतील सर्टीफिकेट त्यांनी ट्विटरवर शेअर केले तेव्हा. आयएएस असलेल्या अवनीश शरण दहावीत असताना 44 टक्के घेऊन फक्त पास झाले होते.

प्रत्येकाला ही कहाणी आपलीच वाटते

अवनीश शरण यांचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यांची ही अपयशाची गोष्ट अनेकांना आपलीच वाटते, म्हणून त्यांच्यासारखेच अनेकांनीही ट्विट केले आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर असणाऱ्या अनेकांनी अवनीश शरण यांची ही गोष्ट आपल्यासाठी आत्मबळ वाढवणारी असल्यचे म्हटले आहे. त्यामुळे निखिल श्रीवास्तवने लिहिले आहे की,TEDx मध्ये तुम्हाला बोलवलं पाहिजे, म्हणजे टक्केवारीला घेऊन जो भ्रम बनवण्यात आला आहे, तो भ्रमाचा भोपळा तर फुटेल. म्हणजे काही विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेत नापास होतात, ज्यांच्या वाट्याला अपयश येतं, तेसुद्धा अवनीश शरण यांच्या गोष्टीने प्रभावित होतील आणि यशाकडे नव्या नजरेने बघतील