AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

icai ca inter result 2021 : आयसीएआय सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता, निकाल कुठं पाहायचा?

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयने सीए इंटर निकाल 2021 ची तारीख जाहीर केली आहे. जुन्या आणि नवीन दोन्ही अभ्यासक्रमांसाठी चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे.

icai ca inter result 2021 : आयसीएआय सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता, निकाल कुठं पाहायचा?
आयसीएआय
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 9:24 AM
Share

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयने सीए इंटर निकाल 2021 ची तारीख जाहीर केली आहे. जुन्या आणि नवीन दोन्ही अभ्यासक्रमांसाठी चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थ्याी उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर icai.org वर भेट देऊन निकाल जाहीर झाल्यानंतर पाहू शकतात. अधिकृत सूचनेनुसार, जुलै 2021 मध्ये आयोजित चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट परीक्षा (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) चे निकाल उमेदवार icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.

ईमेलवरही निकाल उपलब्ध होणार

उमेदवारांना त्यांच्या ईमेलवरही निकाल मिळू शकतो, यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org ला भेट देऊन 17 सप्टेंबरपासून नोंदणी करावी लागेल. नोंदणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल लागताच त्यांच्या ईमेलवर पाठवले जाईल.

ICAI CA Result 2021 या स्टेप्स करा चेक

स्टेप 1 : उमेदवार अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर भेट द्या. स्टेप 2 : आता वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : त्यानंतर विनंती केलेली माहिती सबमिट करून लॉगिन करा. स्टेप 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5 : पुढील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा

CA ची फाउंडेशन, इंटर आणि फायनल परीक्षांसाठी नोंदणी सुरू

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने डिसेंबर सत्रातील CA परीक्षा 2021 साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. फाउंडेशन, इंटरमीडिएट (आयपीसी), इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. जे उमेदवार नोंदणी करू इच्छितात ते icaiexam.icai.org वर ICAI च्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

ICAI CA परीक्षा 2021 परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी?

स्टेप 1: ICAI CA च्या डिसेंबर मधील सत्राच्या परीक्षेला अर्ज करायचा असल्यास प्रथम आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.in या वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2:तिथे परीक्षार्थी नोंदणीवर क्लिक करा. स्टेप 3:विद्यार्थ्यांनी अर्जातील सर्व माहिती अचूकपणे सादर करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. स्टेप 4: परीक्षा फी जमा करावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावा. स्टेप 5:अर्ज डाऊनलोडकरुन त्याची प्रिंटआऊट सोबत ठेवावी. स्टेप 6:परीक्षेची फी भरण्यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा वापर करावा.सीए परीक्षा नोंदणी फी

नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आणि विलंब शुल्क 600 रुपये भरावे लागतील. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आणि विलंब शुल्क 10 अमेरिकन डॉलर आहे.

इतर बातम्या

ICAI CA May Exam 2021: मे महिन्यातील सीए परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

ICAI CA Foundation June 2021: जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

ICAI CA Inter Result 2021 icai likely to declare July Intermediate result today on caresults.icai.org, icai.nic.in

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.