India-China: भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच चीनमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करता येणार! 20,000 हून अधिक विद्यार्थी अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत

चीनमध्ये 20,000 हून अधिक विद्यार्थी आपला अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात हे विद्यार्थी भारतात परतले होते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आता कोविड व्हिसा निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.

India-China: भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच चीनमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करता येणार! 20,000 हून अधिक विद्यार्थी अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत
GATE Preparation
Image Credit source: istockphoto.com
रचना भोंडवे

|

Aug 14, 2022 | 3:57 PM

भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच चीन (China) मध्ये परतून पुन्हा अभ्यास पूर्ण करता येणार आहे. भारतातील चीनचे राजदूत सन वेईडोंग म्हणाले की, येत्या भविष्यात भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी पुन्हा अभ्यास सुरू करेल. दोन्ही देशांचे संबंधित विभाग या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 (Covid-19) नंतर चीन सरकारकडून पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांचे देशात स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांची सरकारे एकत्र येऊन काम करत आहेत. कोविडच्या सुरुवातीपासूनच भारतीय विद्यार्थी (Indian Students) चीनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत येऊ शकलेले नाहीत.

20,000 हून अधिक विद्यार्थी

भारतातील चीनचे राजदूत सुन वीडोंग म्हणाले, ‘चीन भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चीनमध्ये अभ्यासाला सुरुवात करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये 20,000 हून अधिक विद्यार्थी आपला अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात हे विद्यार्थी भारतात परतले होते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आता कोविड व्हिसा निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.

भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीसाठी चीन काम करत आहे

चीनमधून परतणारे बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शाखेचे आहेत. अलीकडील घडामोडींनुसार, लवकरच विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास सुरू करता येईल, असा अंदाज बांधता येऊ शकतो. मंगळवारी झालेल्या मीडिया ब्रीफिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरळीत पुनरागमनासाठी चीन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. “परदेशी विद्यार्थ्यांना चीनमध्ये परत आणण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काम करत आहोत आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे,” वांग वेनबिन यांनी येथे पत्रकारांना सांगितले. लवकरच सर्व परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा धोरण लागू करण्याविषयी काही चिनी मुत्सद्दींनी त्यांना सोशल मीडिया पोस्टबद्दल विचारले. “आम्हाला विश्वास आहे की आम्ही लवकरच भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे पुनरागमन पाहू” वांग म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें