AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jee Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल, अंतिम उत्तर तालिका, कटऑफसह ऑल इंडिया रँक जाहीर होणार, ‘इथे’ पाहा निकाल

Jee Main Result 2021 नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

Jee Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल, अंतिम उत्तर तालिका, कटऑफसह ऑल इंडिया रँक जाहीर होणार, 'इथे' पाहा निकाल
जेईई मेन
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 13, 2021 | 11:22 AM
Share

Jee Main Result 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 आयोजित करण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. निकालासोबत एनटीए जेईई मेन चौथ्या सत्राची अंतिम उत्तर तालिका, कट ऑफ आणि ऑल इंडिया रँकिंग देखील जाहीर करेल अशी माहिती आहे.

जेईई मेन 2021 सत्र 4 चा कसा पाहायचा?

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा. स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. देशातील 7.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान पार पडली. जेईई मेन परीक्षेतील टॉप अडीच लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एक पेक्षा अधिक सत्राची परीक्षा दिली असेल त्यांचं सर्वाधिक गुण ग्राह्य धरली जातील.

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी सुरु होणार

चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीए ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी करेल. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु होईल. आज दुपारी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी सुरु होणार आहे. त्याअगोदर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन जेईई अ‌ॅडव्हान्सड एएटी परीक्षेच्या निकालानंतर सुरू होईल. जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राचा निकाल jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल.

जेईई मेन परीक्षा

जेईई मेन ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. पदवीस्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) JEE मुख्य परीक्षा आयोजित करते.

इतर बातम्या:

Jee Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा संपली; निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार

JEE Main 2021 Result declared : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा तुमचा रिझल्ट

JEE Main 2021 Session 4 Result Expected today on live updates at  jeemain nic in and nta ac in

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?