JEE Mains 2022: लका ते ॲडमिट कार्ड तपासून ठेवायला सांगितलंय NTA ने, चूक झाल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो

परीक्षा शहर किंवा परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्याच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. जेईई मेन परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ठरलेल्या परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार केंद्रे मिळतील यासाठी एनटीए पुरेपूर प्रयत्न करणार आहे. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांशी संबंधित माहितीही छापली जाणार आहे.

JEE Mains 2022: लका ते ॲडमिट कार्ड तपासून ठेवायला सांगितलंय NTA ने, चूक झाल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो
ॲडमिट कार्ड के तरफ ध्यान दे.
Image Credit source: JEE Official Website
रचना भोंडवे

|

Jun 02, 2022 | 11:26 AM

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच जेईई मेन 2022 (JEE Mains 2022) च्या जून परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर करणार आहे. एनटीए 20 जून 2022 पासून जून सत्र परीक्षा घेणार आहे. परीक्षा सुरू होण्यास अवघे तीन आठवडे शिल्लक आहेत. जून सत्रासाठी जेईई मेन 2022 ची प्रवेशपत्रे एनटीए jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जातील. ॲडमिट कार्ड (Admit Card) द्वारे परीक्षा केंद्र आणि शहराची माहिती मिळणार आहे.

प्रवेशपत्रात स्लॉटची माहिती असेल

जेईई मेनच्या जून सत्रासाठी परीक्षा, शहरांची माहिती एनटीएकडून येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. 7 जूनपर्यंत परीक्षा शहरांची यादी जाहीर केली जाणार आहे. जे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी दुसऱ्या शहरात येतात त्यांना प्रवासासाठी आवश्यक ती व्यवस्था आधीच करता यावी यासाठी एनटीए लवकरच परीक्षा शहरांची यादी जाहीर करणार आहे. जेईई मेन 2022 च्या जून सत्रातील प्रवेशपत्र 8 जून ते 10 जून 2022 या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या स्लॉटची माहिती असेल.

महत्वाच्या तारखा

  • परीक्षेसाठी मिळणारं शहर – जून, 2022
  • एनटीएच्या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – जून, 2022 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या या आठवड्यात
  • जून सत्राच्या परीक्षेच्या तारखा – 20 जून ते 29 जून 2022

विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड तपासून ठेवावीत

परीक्षा शहर किंवा परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्याच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. जेईई मेन परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ठरलेल्या परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार केंद्रे मिळतील यासाठी एनटीए पुरेपूर प्रयत्न करणार आहे. ॲडमिट कार्डवर विद्यार्थ्यांशी संबंधित माहितीही छापली जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड तपासून ठेवावीत, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रवेशपत्रातील कोणतीही चूक झाल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

अकरावी प्रवेशाची नोंदणी सुरु

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरु झालीये. ३० मे २०२२ पासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. दुसरा भाग भरण्यासाठी, निकाल लागण्याची वाट बघावी लागणार आहे. एकूण ऑनलाईन अर्जाचे दोन भाग असणार आहेत. काल आलेल्या बातमीनुसार बारावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात लागणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी दिलीये. दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात लागला कि विद्यार्थ्यांना अकरावी साठीच्या प्रवेशाचा ऑनलाईन अर्जाचा उर्वरित भाग भरता येईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें