AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chirag Gupta : गोरेगावचा चिराग गुप्ता कॅट परीक्षेत पहिल्यास्थानी, 100 पर्सेंटाईल मिळवत बाजी मारली

राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या कॉमन अ‌ॅडमिशन टेस्ट 2021 परिक्षेत मुंबईतील चिराग गुप्ता या विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक मिळवला आहे. चिराग गुप्तानं या परीक्षेत 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

Chirag Gupta : गोरेगावचा चिराग गुप्ता कॅट परीक्षेत पहिल्यास्थानी, 100 पर्सेंटाईल मिळवत बाजी मारली
Chirag Gupta (Facebook: Mahendra Silari)
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 11:34 AM
Share

मुंबई: राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या कॉमन अ‌ॅडमिशन टेस्ट 2021 परिक्षेत मुंबईतील चिराग गुप्ता या विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक मिळवला आहे. चिराग गुप्तानं या परीक्षेत 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. चिराग गुप्ता हा 100 पर्सेंटाईल गुण मिळणवाऱ्या 9 विद्यार्थ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. चिराग गुप्तानं हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळलं आहे. मुख्य परीक्षेपूर्वी सराव प्रश्नपत्रिका सोडवल्याची माहिती त्यांनं दिली आहे.

सराव परीक्षांवर भर

चिराग गुप्ता सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येथे शिक्षण घेत आहे. चिराग गुप्तानं गेल्या मार्च महिन्यात परीक्षांची तयारी सुरु केली होती. स्वंयअध्ययन आणि बाजारात उपलब्ध असणाऱ्या पुस्तक, नोटस याच्या अभ्यासासह सराव परीक्षा सोडवल्याचा फायदा झाल्याचं गुप्तानं सांगितलं आहे.

2021 मध्ये झालेल्या कॅट प्रश्नपत्रिकेसंदर्भात बोलताना यंदाच्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी अधिक असल्याची माहिती दिली आहे. चिरागला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, बंगळुरु आणि कोलकाता या तीन संस्थांपैकी एका संस्थेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे. चिराग गुप्तानं कन्सलटन्सीमध्ये आवड असल्याचं सांगितलं आहे. चिराग गुप्ता सध्या बीएस एम एस प्रोग्रामचा अभ्यास पुणे येथील आयआयएसईआर संस्थेत करत आहे.

कॅट परीक्षेचा निकाल 3 जानेवारीला जाहीर

कॅट परीक्षेचा निकाल 3 जानेवारीला जाहीर करण्यात आला होता. निकालामध्ये एकूण 9 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले होते. त्यापैकी 7 विद्यार्थी इंजिनिअर होते. महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले होते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमसह इतर नामांकित संस्थांमध्ये एमबीए प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॅट परीक्षा आयोजित केली जाते. CAT 2021 परीक्षा 28 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. 08 ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवण्यास सांगण्यात आलं होतं.

इतर बातम्या:

Uday Samant : विद्यापीठ, कॉलेज पुन्हा ऑनलाईन? उदय सामंत निर्णय जाहीर करणार

BMC : दहावीचं वर्ष संपताना टॅब खरेदीचा प्रस्ताव, मुंबई महापालिकेचा 39 कोटींचा खर्च नेमका कुणाच्या फायद्याचा?

Maharashtra Mumbai Goregaon Chirag Gupta top in CAT 2021 exam get 100 percentile score

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.