कोरोनामुळे राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर

| Updated on: May 19, 2021 | 3:16 PM

एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. | Medical exams

कोरोनामुळे राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर
वैद्यकीय परीक्षा
Follow us on

मुंबई: राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात (Medical Exams) आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. (Medical courses exams in Maharashtra postponed till 10 June says Amit Deshmukh)

या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. या वैद्यकीय पदवी परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनानं पालक गमावेल्या विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही

भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात दररोज दोन ते तीन लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. काही राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. पालकांचं काम सुटलेय त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आहेत. देशभरात खासगी शाळांच्या फीचा मुद्दा निर्माण होत थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. छत्तीसगडमधील खासगी शाळांच्या संघटनेने आदर्श असा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झालं आहे, त्यांची फी माफ करण्याचा निर्णय छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटनं घेतला आहे.

संबंधित बातम्या:

CBSE चा दहावीच्या निकालाविषयी मोठा निर्णय, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सादर करण्याबाबत महत्वाचे आदेश जारी

कोरोनानं पालक गमावेल्या विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही, ‘या’ राज्यातील खासगी शाळांचा निर्णय

IGNOU June TEE 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं जून सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

(Medical courses exams in Maharashtra postponed till 10 June says Amit Deshmukh)