MHT CET : एमएचटी सीईटी परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाविषयी संभ्रम कायम? विद्यार्थी परीक्षेला कसे पोहोचणार

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वे प्रशासनाला 8 सप्टेंबर रोजी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास देण्यात याव असं पत्र देण्यात आलेलं आहे. परंतु हे पत्र अद्यापही रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे.

MHT CET : एमएचटी सीईटी परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाविषयी संभ्रम कायम? विद्यार्थी परीक्षेला कसे पोहोचणार
MHT CET 2021


मुंबई: राज्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत बारावी नंतरच्या व्यावसायिक शिक्षणासाठी सीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. आज एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट या दोन व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी सीईटीची परीक्षा घेण्यात येत आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान लोकल रेल्वे ने प्रवास करण्यात येणार का हा संभ्रम आहे. राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र पाठवलंय, असं सांगण्यात आलं आहे. तर, रेल्वे प्रशासनाकडून अद्याप पत्र प्राप्त झालं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यावादात विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे.

राज्य सरकारचा 8 सप्टेंबरला पत्र दिल्याचा दावा

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वे प्रशासनाला 8 सप्टेंबर रोजी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास देण्यात याव असं पत्र देण्यात आलेलं आहे. परंतु हे पत्र अद्यापही रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे.

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

  1. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.
  2. मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.
    बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021या दरम्यान होणार आहेत.
  3. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष),बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.
  4. बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि.4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021,
  5. बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021रोजी होणार आहेत.
  6. बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.

20 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार

या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

इतर बातम्या

MHT CET Exam Schedule : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

MHT CET Exam Date : एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा

MHT CET exam started from today Mumbai Local travel of students not cleared by State Government and Railway

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI