MHT-CET : उठा राष्ट्रवीर हो ! ‘CET’च्या तारखा आल्या, सज्ज व्हा, उठा चला !

| Updated on: May 02, 2022 | 6:00 PM

इतर परीक्षांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं दरम्यान आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षेच्या तारखांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे.

MHT-CET : उठा राष्ट्रवीर हो ! CETच्या तारखा आल्या, सज्ज व्हा, उठा चला !
ठा राष्ट्रवीर हो ! 'CET'च्या तारखा आल्या, सज्ज व्हा, उठा चला !
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

मुंबई : सीईटी परीक्षांच्या (CET Exams) तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. इतर परीक्षांदरम्यान एमएचटी सीईटी असेल तर विद्यार्थ्यांचा (Students)गोंधळ होऊ शकतो म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी ट्विटरवर एमएचटी सीईटी परीक्षांची तारीख पुढे ढकलल्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली होती. इतर परीक्षांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं दरम्यान आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या या सीईटी परीक्षेच्या तारखा (Exam Dates)जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षेच्या तारखांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक अशा नावाने या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी महा-एमएचटी-सीईटी / प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र महा-एमएचटी-सीईटी

  • पीसीएम (PCM) ग्रुप – 05 ते 11 ऑगस्ट, 2022
  • पीसीबी (PCB) ग्रुप – 12 ते 20 ऑगस्ट, 2022 (15, 16 व 17 ऑगस्ट वगळून )

एमबीए, एमएमएस, एमसीए, एम.आर्च, बी.प्लॅनिंग इत्यादी आणि आणखी अभ्यासक्रमासाठीची सीईटी आणि त्यांच्या तारखा वेळापत्रकात नमूद केलेल्या आहेत. या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती आणि तारखा दिलेल्या आहेत. दरम्यान या संदर्भातली माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे.

हे सुद्धा वाचा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटलंय,

वर्ष २०२२-२३ करीता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आले असून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर mahacet.org प्रसिद्ध केले आहे.