NVS : नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय? प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन

| Updated on: Nov 18, 2021 | 7:00 AM

इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

NVS : नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय? प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन
Student
Follow us on

पुणे : नवोदय विद्यालय समिती (NVS) ने जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी च्या प्रवेश परीक्षा नोंदणीस मुदतवाढ दिलेली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचं आवाहन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना nvsadmissionclassnine.in आणि https://cbseitms.nic.in/ या वेबसाईटवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सहावीसाठी 30 एप्रिल तर नववीसाठी 9 एप्रिलला परीक्षा

नवोदय विद्यालय समितीनं जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता 9 वी च्या प्रवेशासाठी 9 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तर इयत्ता सहावीसाठी 30 एप्रिल 2022 रोजी परीक्षा घेण्यात येईल. प्रवेश परीक्षा देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व सुरक्षा खबरदारी किंवा कोविड प्रोटोकॉलचे पालन करून घेतल्या जाणार आहेत.

प्रवेश परीक्षेसाठी अर्ज कुठे करायचा?

इयत्ता 9 वीच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage या वेबसाईटला भेट द्यावी तर सहावीच्या वर्गासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावा.

कोण अर्ज करू शकतो?

नवोदय विद्यालय समितीद्वारे जारी केलेल्या माहितीपत्रकानुसार नववीची प्रवेश परीक्षा देणारा विद्यार्थी 2021-22 या शैक्षणिक वर्षात आठवीच्या वर्गात शिकत असावा. तर, सहावीच्या वर्गासाठी प्रवेश परीक्षा देणारा विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिकत असावा.

परीक्षेचे स्वरुप

जेएनवी इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा इंग्रजी, हिंदी संबंधित राज्यातील प्रादेशिक भाषेत आयोजित केली जाते. प्रवेश परीक्षेचा वेळ दोन तासांचा असतो. यामध्ये तीन विभाग असतात आणि 80 वस्तूनिष्ट प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असते. मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित परीक्षण आणि भाषा कौशल्य या विषयावर प्रश्न विचारले जातात. JNVST इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरचं निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित मानला जातो.

इतर बातम्या:

MPSC चा धडाका सुरुच, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, औषध निरीक्षक पदाच्या 87 जागांसाठी जाहिरात

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; … तर संपत्तीही जप्त होणार

Navodaya Vidyalaya Samiti class six and class nine entrance exam dates extended till 30 November check details here