AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे एकनाथ शिंदे यांनी ९ फेब्रुवारीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, कार्यकर्त्यांना होर्डिंग्ज आणि सोहळे टाळण्याचे आवाहन केले आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना
eknath shinde ajit pawar
| Updated on: Feb 06, 2026 | 3:05 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील आपला एक जवळचा सहकारी आणि मित्र गमावल्याची भावना व्यक्त करत एकनाथ शिंदेंनी सर्व प्रकारचे नियोजित सोहळे रद्द केले आहेत.

मी माझा मित्र गमावला आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून येणारी नाही. या वेदनेतून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. मी माझा एक कर्तव्यदक्ष सहकारी आणि मित्र गमावला आहे. अशा परिस्थितीत कोणताही सोहळा करणे मला उचित वाटत नाही. आपण सर्वांनी या परिस्थितीचे गांभीर्य राखून पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

कार्यकर्त्यांसाठी सूचना काय?

वाढदिवसानिमित्त होणारी गर्दी आणि उत्साह टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते, पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शुभेच्छा देण्यासाठी कुणीही पुष्पगुच्छ किंवा महागड्या भेटी आणू नयेत. रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत. तसेच केक कापणे किंवा इतर कोणतेही भव्य कार्यक्रम किंवा सार्वजनिक सोहळे आयोजित करू नयेत. वाढदिवसाचा खर्च टाळून तो निधी सामाजिक कार्यासाठी किंवा गरजूंना मदत करण्यासाठी वापरावा, असे संकेतही देण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदेच्या संवेदनशीलतेचे कौतुक

या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रातून एकनाथ शिंदेच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. येत्या ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी किंवा इतर कुठेही वाढदिवसाचे सेलिब्रेशन होणार नसल्याचे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ