AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही सर्व कंटेंट काढून टाकला..; ‘घूसखोर पंडत’च्या वादावर मनोज वाजपेयीने सोडलं मौन

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'घूसखोर पंडत' या चित्रपटाच्या वादावर अखेर मुख्य अभिनेता मनोज वाजपेयीने मौन सोडलं आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व कंटेंट काढून टाकल्याची माहिती त्याने दिली आहे. हा नेमका वाद काय आहे, ते समजून घ्या..

आम्ही सर्व कंटेंट काढून टाकला..; 'घूसखोर पंडत'च्या वादावर मनोज वाजपेयीने सोडलं मौन
मनोज वाजपेयीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 3:09 PM
Share

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जवळपास 20 नवे चित्रपट आणि वेब सीरिज नुकतेच जाहीर करण्यात आले होते. यामध्ये नीरज पांडे दिग्दर्शित ‘घूसखोर पंडत’ या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच तो वादात अडकला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून वेगळं राजकारण सुरू झालं आहे. देशातील विविध ठिकाणी या चित्रपटाविरोधात निदर्शनं केली जात आहेत. तर उत्तर प्रदेश सरकारनेही या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ‘घूसखोर पंडत’ या चित्रपटाच्या नावावरून हा मोठा वाद निर्माण झाला आहे. पंडित आणि ब्राह्मण समाजाचे लोक रस्त्यावर उतरून त्याविरोधात निदर्शनं करत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे. इतकंच नव्हे तर या वादात राजकीय नेतेसुद्धा उतरले आहेत.

या चित्रपटाचं नाव बदललं जावं किंवा त्याच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी केली जात आहे. आता या चित्रपटातील मुख्य अभिनेता मनोज वाजपेयीने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने म्हटलंय, ‘लोक ज्या भावना आणि जी चिंता व्यक्त करत आहेत, त्यांना मी समजतो. मी त्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहतोय. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत सहभागी असता, तेव्हा थांबून काळजीपूर्वक ऐकणं स्वाभाविक आहे. एक अभिनेता म्हणून मी माझ्या व्यक्तिरेखेतून आणि कथेतूनच चित्रपटात येतो. माझ्यासाठी हे पात्र एका असुरक्षित माणसाबद्दल होतं, जो हळूहळू स्वत:ला समजून घेतो आणि चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो.’

मनोज वाजपेयीने निर्मात्यांच्या निर्णयाचं समर्थन करत पुढे लिहिलं, ‘या चित्रपटाचा उद्देश कोणत्याही विशिष्ट समुदायावर भाष्य करण्याचा नव्हता. नीरज पांडे यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव असा आहे की ते त्यांचे चित्रपट खूप गांभीर्याने आणि काळजीपूर्वक बनवतात. चित्रपट निर्मात्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन पोस्टर्स आणि व्हिडीओ यांच्यासह सर्व प्रमोशनल कंटेंट काढून टाकलं आहे. यावरून ते या गोष्टीला किती गांभीर्याने घेत आहेत, हे दिसून येतं.’

‘घुसखोर पंडत’ या चित्रपटात मनोज वाजपेयीने एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याच्यासोबत नुशरत भरुचा, साकिब सलीम, अक्षय ओबेरॉय आणि किकू शारदा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. परंतु वादानंतर त्यांनी हा टीझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे.

Follow Us
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु