AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घुसखोर पंडत’ सीरिजवरून तापलं राजकीय वातावरण; मायावतींची थेट केंद्राकडे ही मागणी

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'घुसखोर पंडत' या नव्या सीरिजवरून सध्या उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादात आता मायावती यांनी उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

'घुसखोर पंडत' सीरिजवरून तापलं राजकीय वातावरण; मायावतींची थेट केंद्राकडे ही मागणी
मनोज वाजपेयी, मायावतीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 12:21 PM
Share

उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजने चांगलीच खळबळ उडवली आहे. मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरिजमुळे तिथलं वातावरण तापलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशावरून या सीरिजचे दिग्दर्शक आणि टीमच्या विरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता या सीरिजच्या वादात बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उडी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे. पंडितांना घुसखोर म्हणण्याबद्दल त्यांची तक्रार असून या सीरिजमध्ये देशातील ब्राह्मण समुदायाचा अपमान केल्याचा आरोप त्यांना केला आहे.

मायावती यांनी याप्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘गेल्या काही काळापासून फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर चित्रपटांमध्येही पंडितांना घुसखोर म्हणत देशभरात त्यांचा अपमान आणि अनादर केला जात आहे. ही अत्यंत दु:खद आणि चिंतेची बाब आहे. यामुळे संपूर्ण ब्राह्मण समुदायात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. माझा पक्ष या सीरिजचा तीव्र निषेध करतो. केंद्र सरकारने तात्काळ यावर बंदी घालावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सीरिजच्या शीर्षकावरून वाद

‘घुसखोर पंडत’ या वेब सीरिजच्या शीर्षकावरून सुरू असलेला हा संपूर्ण वाद आता उत्तर प्रदेशातील राजकारणालाही प्रभावित करतोय. उत्तर प्रदेशात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणनिर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांत ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा जवळपास सर्वच विरोधी पक्षांकडून उचलून धरण्यात आला होता. ब्राह्मण समुदायाच्या दुर्लक्षाचा मुद्दा समाजवादी पार्टीपासून बहुजन समाज पार्टीपर्यंत सर्वांनी उपस्थित केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ब्राह्मण समाज हा भाजपच्या बाजूने एकजूट दिसला होता. काही दिवसांपूर्वीच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ब्राह्मण आमदारांची एक बैठकसुद्धा झाली. यावरून भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने प्रश्न उपस्थित केला होता. प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी हे ब्राह्मण आमदारांना इशारा देताना दिसले. त्यानंतरच मायावती यांनी या मुद्द्यावर एक निवेदन जारी करून अशा बैठकांचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला.

2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी ब्राह्मण समाजाच्या मतपेढीला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मागासवर्गीय, दलित आणि मुस्लीम मतपेढींसह ब्राह्मणांनाही एकत्र करून राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर आता मायावती पुन्हा एकदा ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Follow Us
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...