AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात, एका निर्णयाने नेपाळचं दिवाळं निघणार

बालेन शाहा सातत्याने भारतविरोधी निर्णय घेताना दिसत आहेत, परंतु आता भारताने नेपाळला मोठा धक्का दिला आहे, त्यामुळे नेपाळचे पंतप्रधान चांगलेच अडचणीत आले आहेत. मोठी बातमी समोर आली आहे.

बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात, एका निर्णयाने नेपाळचं दिवाळं निघणार
बालेन शाहा यांना भारताचा मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 04, 2026 | 5:47 PM
Share

काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये जेन झीने मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान बनले. परंतु बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान बनल्यानंतर ते सातत्याने भारतविरोधी निर्णय घेताना दिसत आहेत. पंतप्रधान होताच त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर लावला होता. 100 रुपयांपेक्षा जरी अधिक सामान भारतामधून आयात केलं तरी त्यावर कर लावण्याची घोषणा बालेन शाह सरकारने केली होती. त्यानंतर त्यांनी लेपूलेखवर देखील दावा केला होता. एवढंच नाही तर भारतामधून नेपाळमध्ये जाणाऱ्या वाहनांवर त्यांनी मोठा टोल लावण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडी सुरू असताना आता भातराने मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नेपाळची मोठी कोंडी झाल्याचं पहायला मिळत आहे.

नेपाळमधून भारतात मोठ्या प्रमाणात चहापावडर येते, परंतु भारताने आता चहापावडर तपासणीची प्रक्रिया अतिशय कडक केल्यामुळे नेपाळ मोठ्या अडचणीत सापडलं आहे. एक मे पासून नेपाळचा चहा भारतात येणं जवळपास बंदच झाला आहे. याचा मोठा फटका हा नेपाळला बसला आहे. नेपाळचं मोठं नुकसान झालं आहे. नेपाळवर चहा निर्मितीचे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे आता नेपाळने आपली चहापावडर विक्रीसाठी अन्य देशाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, तसा सल्ला तेथील अधिकाऱ्यांनी नेपाळ सरकारला दिला आहे. चहापावडरच्या विक्रीसाठी भारत सोडून आता इतर देशांमधील बाजारपेठेचा देखील शोध घेतला पाहिजे, तसेच नेपाळमध्ये तयार होणाऱ्या चहापावडरच्या क्वालिटीमध्ये देखील सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान नेपाळने देखील आता नव्या बाजपेठांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नेपाळकडून आता आपल्या चहा विक्रिसाठी युरोप आणि जपानमधील बाजारपेठांचा शोध घेतला जात आहे. नेपाळला मोठा फटका बसत असून, सध्या नेपाळमधील काही चहा कारखान्यांनी आपलं उत्पादन बंद ठेवलं आहे. तसेच पुढील तीन वर्ष भारतामधून नेपाळला कोणत्याही प्रकारची साखर देखील निर्यात केली जाणार नाहीये.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ