AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर उदय सामंत, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर उदय सामंत, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Uday Samant, sanjay ShirsatImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 3:03 PM
Share

अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. दरम्यान त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तसेच त्यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.  शपथविधी लवकर कोणी करायला लावला? असं लोक विचारत आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे दु:खद घटनेनंतर लवकर शपथविधी होणं, हे लोकांना आवडलं नाही, अशी प्रतिक्रिया यावर संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच लोकभावना मांडली, कोणाचा गैरसमज झाला असेल तर देणंघेणं नाही, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत ?

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होणं यामध्ये कोणाला वाईट वाटलं, असं अजिबात नाही. पण हे इतक्या लवकर का झालं? कोणी करायला लावलं का? मगे हे कोणी घडवून आणत आहे का? अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत. पण तुम्ही जर सोशल मीडियावर गेलात, किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघताना जर तुम्ही खाली येणाऱ्या कमेंट वाचल्या तर या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील शंका आहेत, त्याच्यामध्ये कोणी काय म्हटलं, त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. परंतु सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या, याचं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मनापासून समाधान आहे. सुनेत्रा पवार या अजित पवारांचा वारसा नक्की पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांनी काय म्हटलं?

दु:खद घटना घडल्यानंतर इतक्या लवकर शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसांना पटलेलं नाहीये. म्हणून मी त्यावेळेला माझी भावना व्यक्त केली. त्यामुळे जर कोणाचा काही गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा