AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG 2022: नीट परीक्षेची सिटी अलॉटमेंट स्लिप जारी! चेक करा तुमची परीक्षा कोणत्या शहरात

विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात घ्या की हे नीट प्रवेशपत्र 2022 नाही तर केवळ आपल्या परीक्षेचे शहर, ठिकाण इत्यादीची माहिती आहे.

NEET UG 2022: नीट परीक्षेची सिटी अलॉटमेंट स्लिप जारी! चेक करा तुमची परीक्षा कोणत्या शहरात
NEET PG CounsellingImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 29, 2022 | 3:13 PM
Share

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट 2022 परीक्षा (National Entrance Exam Test Exam 2022) सिटी स्लिप आज, 29 जून, 2022 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी, (National Testing Agency) ऑनलाइन जाहीर केली आहे. या अलॉटमेंटमुळे नीट यूजी 2022 प्रवेशपत्रही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार आता neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवरून त्यांची एनईईटी एक्झाम सिटी स्लिप (Exam City Slip) ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. यासाठीची थेट लिंक आणि इतर तपशील खाली दिले आहेत. नीट २०२२ परीक्षा केंद्राचं शहर लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात घ्या की हे नीट प्रवेशपत्र २०२२ नाही तर केवळ आपल्या परीक्षेचे शहर, ठिकाण इत्यादीची माहिती आहे. एनईईटी यूजी प्रवेशपत्र सहसा या शहरांची लिंक प्रसिद्ध केल्यानंतर प्रसिद्ध केले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेशपत्र मिळू शकतं.

NEET अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक

नीट यूजी 2022 परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आला नसून ती 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. या परीक्षा सिटी स्लिप्स डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा एनईईटी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल. ते डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

NEET 2022 Exam City Slips कसे डाउनलोड करावे?

  1. उमेदवारांनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा  neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी
  2. होमपेजवर ‘ॲडव्हान्स इन्टिमेशन ऑफ एक्झामिनेशन सिटी फॉर नीट(यूजी)-2022’ या लिंकवर क्लिक करा.
  3. आता एक नवीन पेज उघडेल जिथे तुमचा अर्ज क्रमांक आणि विचारलेले इतर तपशील भरा आणि सबमिट करा.
  4. आता आपली नीट यूजी परीक्षा सिटी स्लिप आपल्या स्क्रीनवर असेल.
  5. तुम्ही त्याची प्रिंट काढून तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्हही करू शकता.
  6. आपल्याला परीक्षेसाठी कोणतं शहर मिळालंय हे तपासण्याची थेट लिंक – इथे क्लिक करा

एनटीएने दिले संकेत

नीट प्रवेशपत्राची प्रतीक्षा आणि या परीक्षा सिटी अलॉटमेंट स्लिपच्या सोडती बरोबरच नीट 2022 पुढे ढकलण्याच्या मागण्यांनीही सोशल मीडियावर जोर धरला आहे. या परीक्षांच्या विलंबाबाबत कोणतीही अपडेट नसली तरी या परीक्षा शहरांच्या स्लिप्स जाहीर करून एनटीएने 17 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी नीट यूजी 2022 प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच कधीही जाहीर केले जाईल, असे संकेत दिले आहेत.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.