NTA UGC NET 2021: नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 20 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात

| Updated on: Nov 14, 2021 | 10:54 AM

एनटीएनं यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. ज्या उमदेवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध आहेत.

NTA UGC NET 2021: नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 20 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात
UGC NET 2021
Follow us on

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होणार आहेत. एनटीएनं यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. ज्या उमदेवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध आहेत.

UGC NET 2021 Admit Card डाऊनलोड कसं करावं?

स्टेप 1 : UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

स्टेप 2 : होमपेजवर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेसह सुरक्षा कोड नोंदवून लॉगीन करा.

स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आऊट घ्या.

कोरोनामुळं परीक्षा लांबणीवर

देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षेचे आयोजन केलं जातं. मात्र 2020 मध्ये कोरोनामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती.

नेट परीक्षा मे महिन्यामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ते 17 मे दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

इतर बातम्या:

UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परीक्षा

Nora Fatehi Viral Video | ‘कुसू कुसू’ गाण्यावर गायिकेसह थिरकली नोरा फतेही, बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल

शाळेत एकत्र खेळणारे जिवलग मित्र आज T20 World Cup च्या फायनलमध्ये आमने-सामने

Nta ugc net 2021 exam 2021 admit card released how to download