Nora Fatehi Viral Video | ‘कुसू कुसू’ गाण्यावर गायिकेसह थिरकली नोरा फतेही, बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवुडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत आता नोरा फतेहीच्या नावाचाही समावेश झाला आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. दररोज ती तिच्या फोटो आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी जोडलेली असते. तिचे कोणतेही गाणे, व्हिडीओ किंवा फोटो आले तर ते व्हायरल होणे निश्चितच असते. आता नुकतेच तिचे 'कुसू-कुसू' गाणे रिलीज झाले आहे.

Nora Fatehi Viral Video | ‘कुसू कुसू’ गाण्यावर गायिकेसह थिरकली नोरा फतेही, बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल
Nora Fatehi

मुंबई : बॉलिवुडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत आता नोरा फतेहीच्या नावाचाही समावेश झाला आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. दररोज ती तिच्या फोटो आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी जोडलेली असते. तिचे कोणतेही गाणे, व्हिडीओ किंवा फोटो आले तर ते व्हायरल होणे निश्चितच असते. आता नुकतेच तिचे ‘कुसू-कुसू’ गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याची लोकांनी जितकी वाट पाहिली तितकीच आता त्यांचे चाहते सत्यमेव जयते-2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटातील ‘कुसू कुसू’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले आहे.

चित्रपटाचा हा ट्रॅक सर्वांनाच आवडला आहे, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या गाण्याची गायिका जहरा एस खान आणि नोरा फतेही या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. वायरल भयानीने हा डान्स व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या डान्सचे खूप कौतुक करत आहेत. यासोबतच रील्सही बनवल्या जात आहेत. हे गाणे हिट लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे. या व्हिडिओला काही तासांत लाखो लाईक्स मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

नोराच्या चाहत्यांना हा डान्स व्हिडीओ खूप आवडला आहे. तिचा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघितला जात आहे. तसेच, हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहे. गाण्याच्या या यशाच्या सेलिब्रेशन दरम्यान, नोरा फतेही आणि गायिका जहरा एस खान यांनी कुसू-कुसूच्या सुरात अप्रतिम नृत्य केलं आहे. तिचा हा बेली डान्स व्हिडीओ सर्वांनाच आकर्षित करणारा आहे.

‘सत्यमेव जयते-1’ मधील ‘दिलबर दिलबर’ या गाण्यावर नोराने उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. याशिवाय, बाटला हाऊसच्या साकी-साकी या गाण्यावरही त्यांची वाहवा झाली. सोशल मीडिया यूजर्स नोरापेक्षा या गाण्याच्या लिरिक्सकडे जास्त लक्ष देत आहेत. काही ट्विटर युजर्सना हे गाणे खूप आवडले आहे. तर काही यूजर्स गाण्याच्या लिरिक्सची खिल्ली उडवत आहेत. अलीकडे या गाण्यावर बरेच मीम्स देखील पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या :

Video: पाठवणीवेळी रडण्याचा आईचा आग्रह, वधूला मेकअप खराब होण्याची चिंता, पाहा भन्नाट व्हिडीओ

Video: या चिमुरड्या मुलींच्या मुव्हज पाहून नोरा फतेहीही घायाळ, नेटकरी म्हणाले याल म्हणतात टॅलेंट

Published On - 10:49 am, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI