UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. यूजीसी नेट 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार होती. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परीक्षा
UGC NET 2021


नवी  दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. यूजीसी नेट 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार होती. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.

नेट परीक्षा वेळापत्रकात वारंवार बदल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन पहिल्यांदा 6 ऑक्‍टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नव्या तारखा जाहीर केल्या. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार होते. नेट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आले. पुन्हा परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आह असल्याचं जाहीर करण्यात आलं. आता पुन्हा एकदा परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आता 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान परीक्षा होणार आहे.

UGC NET 2021 Admit Card डाऊनलोड कसं करावं?

स्टेप 1 : UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

स्टेप 2 : होमपेजवर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेसह सुरक्षा कोड नोंदवून लॉगीन करा.

स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आऊट घ्या.

कोरोनामुळं परीक्षा लांबणीवर

देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षेचे आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. नेट परीक्षा मे महिन्यामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ते 17 मे दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

इतर बातम्या:

IND vs PAK, T20 World Cup 2021: ‘माही नॉट दिस मॅच प्लीज!’ पाकिस्तानी तरुणीच्या विनंतीवर धोनीचा एपिक रिप्लाय

T20 WC, India vs Pakistan: दुबईत आज आर-पारची लढाई, भारत-पाकिस्तानचे सर्वात मोठे चाहते दुबईत दाखल

UGC NET 2021 exam postpone again by National Testing Agency check new dates here exam conduct in November and December

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI