AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ अशी PhD कुठेच चालणार नाही, यूजीसीने दिल्या सूचना…

ऑनलाईन पीएचडी संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या ugc.ac.in या वेबसाईटवर सूचना जाहीर केली आहे.

'ही' अशी PhD कुठेच चालणार नाही, यूजीसीने दिल्या सूचना...
| Updated on: Nov 02, 2022 | 3:58 PM
Share

नवी दिल्लीः पीएचडी करणाऱ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारत सरकार ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून आता पीएचडी करणाऱ्यांना एक धोक्याचीच सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी यूजीसीच्या या सुचनेकडे दुर्लक्ष करु नका असा सल्लाही देण्यात आला आहे. कारण विद्यार्थ्यांची छोटीशी चुकही त्यांचे सगळं करियर बर्बाद करु शकते. तुम्ही पीएचडी धारक व्हाल मात्र ती पदवी भारतात कुठेच मान्य केली जाणार नाही.

त्यामुळे यूजीसी आणि एआयसीटीईकडून सूचना देण्यात आली आहे की, कोणत्याही ऑनलाईन एज्युकेट ऑनलाईन शिक्षण संस्थांकडून तुम्ही पीएचडी केला असला किंवा परदेशी विद्यापीठातूनही पीएचडी मिळवली असली तरी ती भारतामध्ये कोणत्याही विद्यापीठात ग्राह्य मानली जाणार नाही.

या पीएचडी संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या ugc.ac.in या वेबसाईटवर सूचना जाहीर केली आहे. त्याबरोबरच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुनही जाहीर केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही विदेशी विद्यापीठाबरोबर किंवा एज्युकेट कंपनीकडून ऑनलाईन पीएचडीच्या जाहिरातील बळी पडू नका. या अशा प्रकारच्या शिक्षणाला यूजीसीकडून कोणतीही मान्यता देण्यात येत नाही. यूजीसीबरोबरच एआयसीटीईकडून ही नोटीस जाहीर करण्यात आली आहे.

पीएचडी संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना सल्लाही देण्यात आला आहे. पीएचडीसाठी प्रवेश घेताना त्या संदर्भातील सर्व माहिती तपासून घ्या. त्यासाठी UGC PhD Regulation 2016 नीट वाचणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या जाहिरातींनाही बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांची माहिती घेऊन प्रवेश निश्चित करण्याचा सल्ला यूजीसीने दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांतर्गत असा कोणताही फ्रँचायझी करार मंजूर झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.