AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, 42 हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

सरकारी आकडेवारीनुसार भारतातील 42 हजार 74 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. Ramesh Pokhariyal Nishank drinking water

धक्कादायक, 42 हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
रमेश पोखरियाल निशंक
| Updated on: Mar 19, 2021 | 11:00 AM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी देशातील 42 हजारपेक्षा जास्त शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची माहिती राज्यसभेत दिली. तर 15 हजार पेक्षा जास्त शाळांमध्ये शौचालये नाहीत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी राज्यसभेत ही माहिती लेखी उत्तरात दिली. एकात्मिक जिल्हा माहिती प्रणाली शिक्षण (यूडीएसई) च्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली. (Ramesh Pokhariyal Nishank said forty two thousand schools lack of drinking water)

10 लाख शाळांमध्ये पाण्याची सुविधा

रमेश पोखरियाल यांनी पुढे दिलेल्या माहितीप्रमाणे, “यूडीएसईईनुसार 2018-19 मध्ये देशातील 10 लाख 41 हजार 327 सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. तर, 10 लाख 68 हजार 726 शाळांमध्ये शौचालये आहेत.” पोखरियाल म्हणाले, “राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारीसह सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सर्व मुलांसाठी सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे, अशा सूचना वारंवार दिल्या आहेत.” सर्व शाळांमध्ये सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध व्हावं, अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

आसाम पाण्याच्याबाबतीत पिछाडीवर

सरकारी आकडेवारीनुसार 42 हजार 74 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यापैकी सर्वाधिक 8 हजार 522 शाळा आसाममधील आहेत. आंध्र प्रदेशात 3771, बिहारमध्ये 4270, जम्मू-काश्मीरमध्ये 2158, मध्यप्रदेशमध्ये 5 हजार 529, झारखंडमध्ये 1840, मेघालयात 5208, राजस्थानमध्ये 2627, उत्तर प्रदेशात 3368 आणि पश्चिम बंगालमध्ये 1520 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.

मुलींसाठी पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा नसल्याच्या बाबतीतही आसाम पहिल्या क्रमांकावर आहे. आसाममधील 13,503 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत. तसेच बिहारमध्ये 9471, जम्मू-काश्मीरमध्ये 1379, कर्नाटकात 1519, मध्य प्रदेशात5975, मेघालयात 1933, ओडिशामध्ये 2484, राजस्थानमधील 1061 आणि पश्चिम बंगालमध्ये 2142 शाळा आहेत.

संबंधित बातम्या :

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

UGC NET Exam Date : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा, अर्ज कुठे करणार? वाचा सविस्तर (Ramesh Pokhariyal Nishank said forty two thousand schools lack of drinking water)

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.