RTE च्या 25 टक्के राखीव जागांची सोडत जाहीर, पालकांना ‘या’ तारखेपासून प्रवेशाची सूचना मिळणार

RTE च्या 25 टक्के राखीव जागांची सोडत जाहीर, पालकांना 'या' तारखेपासून प्रवेशाची सूचना मिळणार
आरटीई प्रवेश

शिक्षण अधिकार म्हणजेच RTE कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या प्रवेशाची लॉटरी ऑनलाईन पद्धतीनं काढण्यात आली आहे. RTE Online Lottery

Yuvraj Jadhav

|

Apr 08, 2021 | 10:21 AM

मुंबई: शिक्षण अधिकार म्हणजेच RTE कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या प्रवेशाची लॉटरी ऑनलाईन पद्धतीनं काढण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. 15 एप्रिलनंतर पालकांना प्रवेश प्रक्रियेचे संदेश पाठवले जाणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. आरटीई प्रवेशाची ऑनलाईन सोडत शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी दत्तात्रय जगताप, दिनकर टेमकर आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. आरटीई कायद्यांतर्गत पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जाते. RTE अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. (Right to Education 25 per cent seats in private unaided school online lottery declared by Maharashtra Education Department)

वर्षा गायकवाड यांचं ट्विट

आरटीई कायद्याअतंर्गत प्रवेश कुणाला?

शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळेत 25 टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवल्या जातात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतिही अट ठेवण्यात आलेली नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

आरटीईअंतर्गत किती जागांवर प्रवेश

मुंबईमधध्ये आरटीई साठी 352 शाळांमध्ये 6 हजार 463 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामधील 292 शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित आहेत तर 62 शाळा राज्य सरकारच्या शिक्षण बोर्डाशी संलग्नित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 96801 जागांवर या कायद्यांतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. राज्याच्या 36 जिल्ह्यातील 9 हजार 431 शाळांमध्ये 25 टक्के जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

संबंधित बातम्या:

RTE अंतर्गत प्रवेश नोंदणी सुरु, 96 हजार विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण

JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘या’ दिवशी निकाल जाहीर होणार

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर

(Right to Education 25 per cent seats in private unaided school online lottery declared by Maharashtra Education Department)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें