UPSC 2021 Results: डोळ्यांची गरज माणसाला, स्वप्नांना तर आत्मविश्वास पुरेसा! दिल्लीचा दृष्टिहीन सम्यक जेव्हा देशात सातवा येतो…

मात्र, सम्यकची निवड वेगळी का आहे, त्याचं यश थोडंसं हटके का आहे तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे तो दृष्टिहीन आहे, असं असूनही त्याने यूपीएससीसारखी खडतर परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलीये.

UPSC 2021 Results: डोळ्यांची गरज माणसाला, स्वप्नांना तर आत्मविश्वास पुरेसा! दिल्लीचा दृष्टिहीन सम्यक जेव्हा देशात सातवा येतो...
सम्यक एस जैन UPSC 2021
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 1:59 PM

नवी दिल्ली : यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर (UPSC CSE 2021 Result) झाला आहे. यंदा या परीक्षेत 685 उमेदवार पात्र ठरले आहेत. या उमेदवारांपैकी दिल्लीतील रोहिणी भागात राहणाऱ्या सम्यक एस जैन या विद्यार्थ्याने या परीक्षेत 7 वा क्रमांक (Samyak Jain UPSC AIR 7) मिळवला आहे. मात्र, सम्यकची निवड वेगळी का आहे, त्याचं यश थोडंसं हटके का आहे तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे तो दृष्टिहीन आहे, असं असूनही त्याने यूपीएससीसारखी खडतर परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सम्यकने सांगितले की, निकाल पाहून मला खूप आनंद झाला. आपला रँक सिंगल डिजिटमध्ये (Single Digit Rank UPSC) येईल याची कल्पनाही केली नव्हती, असे तो म्हणाला. त्याच्यासाठी हे एखादं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. तो पुढे म्हणाला की, निकाल पाहून त्यांना इतका आनंद झाला आहे की ते आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाहीत.

इंग्रजी पत्रकारितेचा डिप्लोमा

सम्यक हा दिल्लीतील रोहिणीमध्ये राहतो. जर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाले तर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या एसओएलमधून इंग्रजी ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केलीये. पदवीनंतर त्यानी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून (IIMC) इंग्रजी पत्रकारितेचा डिप्लोमा केला. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. सम्यकने 2020 साली पहिल्यांदा यूपीएससी दिली होती, ज्यामध्ये तो अपयशी ठरला. मात्र, त्याने कष्ट करणे थांबवले नाही आणि सततच्या प्रयत्नांमुळे तो दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला. इतकंच काय तर दुसऱ्याच प्रयत्नांत त्याने एक अंकी रँकही मिळवला आहे.

“अंध असल्यामुळे…”

यूपीएससीचा प्रवास इतका सोपा नव्हता, अंध असल्यामुळे पीडब्ल्यूडी प्रवर्गातून परीक्षा द्यावी लागते. परीक्षा देण्यासाठी एका लेखकाची मदत घ्यावी लागते. “प्रीलिम्सच्या परीक्षेत माझ्या आईने माझा पेपर लिहिला होता. मेन्स मध्ये माझा एक मित्र लेखक होता.” तो पुढे म्हणाला की, या प्रवासात माझी आई सर्वात जास्त माझ्यासोबत होती. याशिवाय माझ्या मित्रांनीही मला खूप मदत केली आहे. अभ्यास करण्यासाठी मला डिजिटल स्वरूपातील पुस्तकांची गरज होती. अशा परिस्थितीत माझ्या मित्रांनी माझ्यासाठी आवश्यक त्या सर्व पुस्तकांची व्यवस्था केली. या यशाचे श्रेय मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला, पालकांना आणि माझ्या मित्रांना देऊ इच्छितो कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय कदाचित मी हे पद मिळवू शकलो नसतो.

हे सुद्धा वाचा

 …तयारीसाठी हीच उत्तम वेळ

सम्यकने मार्च 2020 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली होती. जेव्हा कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. तेव्हा कॉलेजंही बंद होते, यूपीएससीच्या तयारीसाठी हीच उत्तम वेळ आहे, असं त्याला वाटलं. ऑनलाइन कॉलेज असल्यामुळे सम्यकला युपीएससीच्या अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला होता. तो रोज 7 ते 8 तास परीक्षेची तयारी करत असे. परीक्षेच्या सततच्या तयारीमुळे त्याने आज संपूर्ण देशात 7 वा क्रमांक मिळवला आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.