School Syllabus: शालेय अभ्यासक्रमात लवकरच भारतीय सैनिकांच्या शौर्याचा समावेश!

ही स्पर्धा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा भाग होती. सशस्त्र दलांच्या वीरकर्मांबद्दल आणि बलिदानाबद्दल मुलांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी वीर गाथा आयोजित केली गेली होती.

School Syllabus: शालेय अभ्यासक्रमात लवकरच भारतीय सैनिकांच्या शौर्याचा समावेश!
Private School Teachers
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Aug 13, 2022 | 4:45 PM

भारतीय सैनिकांच्या (Indian Army) शौर्याचा समावेश देशाच्या शालेय अभ्यासक्रमात करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती जबाबदारीची भावना निर्माण होऊ शकेल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले की, सशस्त्र दलांशी सल्लामसलत करून अभ्यासक्रमात शौर्यपूर्ण कार्य आणि सशस्त्र दलांच्या बलिदानाच्या कथांचा समावेश असेल. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संरक्षण मंत्रालयाने केले होते, ज्यात अनेक अधिकारी (Officers)उपस्थित होते.

सैनिकांचे शौर्य आणि भारताची शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात

“लहानपणापासूनच देशाबद्दलची जबाबदारीची भावना दृढ करण्यासाठी शिक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून आपल्या सैनिकांचे शौर्य आणि भारताची शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात आणि शालेय पुस्तकात आणण्याचे काम करेल” असे प्रधान यांनी सांगितले. ही स्पर्धा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा भाग होती. सशस्त्र दलांच्या वीरकर्मांबद्दल आणि बलिदानाबद्दल मुलांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी वीर गाथा आयोजित केली गेली होती.

वीरगाथा प्रकल्प

21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा झाली, त्यात आठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना निबंध, कविता, रेखाचित्रे आणि मल्टिमीडिया सादरीकरणाच्या माध्यमातून शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावरील प्रेरणादायी कथा सामायिक करण्यास प्रोत्साहित केले गेले. प्रधान म्हणाले की, भारतातील वीरांचा सन्मान करण्यापेक्षा अमृत महोत्सवाचा दुसरा चांगला उत्सव असूच शकत नाही. ते म्हणाले की, वीरगाथा प्रकल्प ही देशभक्तीची तीव्र भावना आणि आपल्या शूरवीरांबद्दल कृतज्ञतेची भावना विकसित करण्याची गुरुकिल्ली आहे.

भविष्यात या स्पर्धेत एक कोटी विद्यार्थी सहभागी होणार

या उपक्रमांतर्गत मिळालेल्या प्रमाणपत्रांसाठी शैक्षणिक पतपुरवठा करण्यासाठी शिक्षण मंत्रालय लवकरच संस्थात्मक यंत्रणा विकसित करेल, असे आश्वासनही शिक्षणमंत्र्यांनी दिले. धर्मेंद्र प्रधान यांनी आमच्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी स्पर्धेचे नाव बदलून ‘आर्मी सुपर २५’ असे करावे, अशी सूचना केली. यावेळी पाच हजार शाळांमधील आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, असे त्यांनी सांगितले. भविष्यात त्याचा विस्तार करण्यात येणार असून, त्यात देशातील सर्व शाळांचा समावेश होणार असून, त्यात एक कोटी मुले सहभागी होणार आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें