राज्यातील विद्यार्थ्यांना आता इस्रायलमध्ये शिकण्याची संधी, राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

| Updated on: Jul 14, 2021 | 4:52 AM

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आता महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना इस्त्रायल येथील विविध संस्थांमध्ये प्रायोगिक शिक्षण घेता येणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना आता इस्रायलमध्ये शिकण्याची संधी, राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ
Follow us on

मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आता महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना इस्त्रायल येथील विविध संस्थांमध्ये प्रायोगिक शिक्षण घेता येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव्ह फिन्केलस्टीन व इस्रायलच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी सॅमी यहाई यांच्या उपस्थितीत एका सहकार्य योजनेचा शुभारंभ मंगळवारी (13 जुलै) राजभवन येथे करण्यात आला (Students from Maharashtra universities also study in Israel know how).

इस्रायलचे पर्यटन मंत्रालय व इस्कॉनशी निगडीत गोवर्धन इको व्हिलेज या संस्थेमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना 10 दिवस इस्रायल येथील शिक्षण, उद्योग जगत, स्टार्टअप आदी संस्थांमध्ये भेट देऊन तेथील कार्यसंस्कृतीचा अभ्यास करता येणार आहे. इस्रायल येथील विद्यार्थ्यांना देखील अशाच प्रकारे भारत भेटीवर येता येणार आहे.

यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरंग दास, गोवर्धन इको व्हिलेजच्या सामाजिक दाय‍ित्व विभागाचे प्रमुख याचनीत पुष्कर्ण तसेच कोकण प्रांत संघचालक डॉ सतीश मोध उ‍पस्थित होते.

हेही वाचा :

‘ठाकरे सरकारनं आज लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढली’, राज्यपालांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचा घणाघात

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करावा; राज्यपालांच्या सूचना

’30 वर्षात 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दान नको हक्क द्या’, शेतकरी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

व्हिडीओ पाहा :

Students from Maharashtra universities also study in Israel know how