Success Story: 10 वेळा नापास, पण जिद्द सोडली नाही; मेहनतीच्या जोरावर बनला कलेक्टर

कठोर मेहनतीच्या जोरावर तुम्ही काहीही साध्य करु शकता. आज आपण आयएएस अवनीश शरण यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. त्यांना दहावीत फक्त 44 टक्के गुण मिळाले होते. तसेच ते 10 वेळा नापास झाले होते, मात्र त्यांना हार मानली नाही. कठोर मेहनतीच्या जोरावर ते यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस बनले आहेत. त्यांचा प्रवास जाणून घेऊयात.

Updated on: Sep 23, 2025 | 9:39 PM
1 / 5
आयएएस अवनीश शरण यांची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्ही अनेकदा पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची कहाणी वाचली असेल, मात्र अवनीश शरण यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तब्बल 10 वेळा अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांनी मेहनतीच्या जोरावर अखेर यश मिळवले आहे.

2 / 5
अवनीश शरण हे सुरुवातील एक एक सामान्य विद्यार्थी होते. त्यांना दहावीला 44 टक्के गुण मिळाले होते. त्यांना बारावीला 65 टक्के आणि त्यानंतर पदवीला 60 टक्के गुण मिळाले होते.

3 / 5
अविनीश शरण यांनी सीडीएस आणि सीपीएफ दोन्ही परीक्षा दिल्या होत्या, मात्र त्यांना अपयश आले. त्यांनी अनेक वेळा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली, मात्र त्यांना तब्बल 10 वेळा अपयष आले. मात्र त्यांनी कधीही प्रयत्न सोडले नाहीत.

4 / 5
त्यांनी अभ्यास सुरु ठेवला सिव्हिल सर्व्हिसेस (यूपीएससी सीएसई) मध्ये त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात ते मुलाखती पर्यंत पोहोचले होते. मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात 77 वी रँक मिळवली व ते आयएएस बनले.

5 / 5
अवननीश शरण यांनी कठोर परिश्रम करत 2009 मध्ये आयएएस बनले. ते सध्या छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. ते आता अनेक तरुणांसाठी प्रेरणा बनले आहेत.