AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor : करिश्माच्या शरीरातून रक्त वाहत होतं, संपूर्ण ड्रेस लाल झालेला.., तेव्हा नक्की काय घडलेलं?

Karisma Kapoor : करिश्मा कपूर हिच्यासोबत तेव्हा नक्की काय झालेलं अभिनेत्रीच्या शरीरातून रक्त वाहत होतं आणि संपूर्ण ड्रेस लाल झालेला... फार कमी लोकांना माहितीये घडलेली घटना... करिश्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते...

Karisma Kapoor : करिश्माच्या शरीरातून रक्त वाहत होतं, संपूर्ण ड्रेस लाल झालेला.., तेव्हा नक्की काय घडलेलं?
अभिनेत्री करिश्मा कपूर
| Updated on: Dec 05, 2025 | 11:26 AM
Share

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना 90 वे शतक गाजवलं… अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत आणि आपल्या सौंदर्याने अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही करिश्मा कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. करिश्मा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता अभिनेत्रीचा असा किस्सा समोर आला आहे, जो फार कोणाला माहिती देखील नसेल… करिश्माच्या शारीरातून रक्त वाहू लागलं होतं आणि अभिनेत्रीचा ड्रेस पूर्ण लाल झालेला. एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ही घटना घडलेली.

दिग्दर्शक डेविड धवन दिग्दर्शित ‘बिवी नंबर 1’ सिनेमात अभिनेता सलमान खान, अभिनेत्री सुष्मिता सेन आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमा आज देखील चाहत्यांच्या पसंतिस उतरतो… नुकताच सिनेमाच्या सेटवरील अशी एक घटना समर आली, ज्यामुळे कळतं की, करिश्मा तिच्या कामासाठी प्रामाणिक आहे…

कॉस्ट्यूम डिझायनर एश्ले रेबेलो यांनी सिनेमातील तणावग्रस्त परिस्थितीबद्दल सांगितलं. एका मुलाखतीत रेबेलो म्हणाले, ‘आम्ही बिवी नंबर 1 सिनेमासाठी शुटिंग करत होतो. एका गाण्याची शुटिंग सुरु होती. तेव्हा मी करिश्माला एक मेटल ड्रेस दिलेला… स्टेप्स करत असताना मेटल तिला सतत टोचत होता… मी पाहिलं गोल्डन ड्रेस पूर्णपणे लाल झालेला… तीच्या शारीरातून रक्त वाहू लागलं होतं… अशात करिश्माची काळजी घेण्यासाठी शुटिंग देखील थांबवण्यात आलं..’

अशात दुसऱ्या दिवशी शुटिंग करू असं कोरियोग्राफरने सांगितलं… पण करिश्माने नकार दिला.. यावर करिश्मा म्हणालेली, ‘आम्ही शुटिंगची पूर्ण तयारी केली होती. दुसऱ्या दुवशी मी माझा ड्रेस बदलला आणि शुटिंग सुरु ठेवली. क्रुने मेटलच्या मागे एक पट्टी बांधली.. स्किन रंगाच्या कपड्याने आधी बांधून घेतलं, त्यानंतर तो मेटलचा ड्रेस घातला… ज्यामुळे त्याच दिवशी शुटिंग पूर्ण करता आली…’ असं देखील करिश्मा म्हणाली.

सांगायचं झालं तर, करिश्मा तिच्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली. पण खासगी आयुष्यात मात्र अनेक संकटं आली. दोन मुलांच्या जन्मानंतर  करिश्मा आणि उद्योजक संजय  कपूर यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने दोन मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला… आता संजय याच्या निधनानंतर त्याची तिसरी पत्नी प्रिया कपूर आणि करिश्मा यांच्यामध्ये वाद सुरु आहे.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.