AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET Exam Scam : पुणे पोलिसांंचं नवं टार्गेट, टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर

जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पोलीस तपासात अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत आहेत.

TET Exam Scam : पुणे पोलिसांंचं नवं टार्गेट, टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 12:26 PM

पुणे: पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार (TET Exam Scam) झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसै घेणरे एजंटांच्या शोधात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील एजंटांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पोलीस तपासात अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत आहेत.

सायबर पोलीस करणार एजंटांची तपासणी

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा प्रकरणी तपासाची चक्र वेगवान केली आहेत. टीईटी परीक्षा प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरु झाली आहे. अभिषेक सावरीकरला पैसे देणाऱ्या एजंटांचा पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून आता एजटांची तपासणी करण्यात येणार आहे.

अभिषेक सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

टीईटी परीक्षा प्रकरणी अभिषेक सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 2018 साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याला अभिषेक सावरीनं 5 कोटी रुपये दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. ज्या परीक्षार्थीकडून पैसे घेतले त्यांचाही शोध घेतला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षेचं काम कोणत्या एजन्सीला द्यायचं यावर विद्यापीठाचा निर्णय झालेलं नाही. ऑनलाईन परीक्षेसाठी एजन्सी नि्वडली नसल्यानं परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जातीय. गेल्यावर्षी विद्यापीठाच्याच एजन्सीनं परीक्षांच काम पाहिलं होतं कदाचित त्याच एजन्सीकडे काम जाण्याची शक्यता आहे. मात्र, एजन्सी लवकर नियुक्त झाली नाही तर मग मात्र फेब्रुवारी – मार्चमधील परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर नवं संकट, पगार थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना, मुख्याध्यापकांना इशारा

TET Exam Scam : टीईटी परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपींना कोट्यवधी मिळवून दिले, पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

Tet Exam Scam pune police now started investigation of agents and students who gave money to Abhishek Sawarikar

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.