AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या बारावीचा निकाल! ना साईट हँग होणार, ना निकालाला उशीर होणार, tv9marathi.com वर सर्वात वेगवान, विश्वासार्ह निकाल

Maharashtra Board Result Date 2022: असा पाहा बारावीचा निकाल आपल्या टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर...

उद्या बारावीचा निकाल! ना साईट हँग होणार, ना निकालाला उशीर होणार, tv9marathi.com वर सर्वात वेगवान, विश्वासार्ह निकाल
उद्या बारावीचा निकाल, ना साईट हँग होणार, ना निकालाला उशीर होणार, tv9marathi.com वर सर्वात वेगवान, विश्वासार्ह निकाल, लॉग ऑन कराImage Credit source: TV9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 9:48 PM
Share

मुंबई: बारावीचा निकाल (HSC Results 2022) बुधवारी (8 जून, 2022) लागणार आहे! बारावीच्या निकालाचे सर्व ताजे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या विभागात पाहायला मिळेल. बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर https://www.tv9marathi.com/career चेक करता येऊ शकणार आहेत. त्यासाठी एक सोपी पद्धत विद्यार्थ्यांना आणि पालकांना फॉलो करावी लागेल. वेगवान आणि अचूक निकाल जाणून घेण्यासाठी फक्त एकच गोष्ट करावी लागेल. ती म्हणजे टीव्ही 9 मराठीची वेबसाईट फॉलो करावी लागेल. जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल अगदी वेळेत लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता निकाल जाहीर होईल. नेमक्या याच वेळेस बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येऊ शकणार नाही. चला तर हा निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत लगेचच समजून घेऊयात..

बारावीच्या निकालापासून तुम्ही फक्त एक क्लिक दूर…

  1. जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या  वेबसाईटला भेट द्या.
  2. करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा
  3. होम पेजवर महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही थेट निकाल पाहू शकाल.
  4. आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
  5. यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.
View this post on Instagram

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

निकाल चेक करायला येण्याआधी ‘हे’ केलंय ना..?

  1. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
  2. सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
  3. सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे.
  4. आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येऊ शकेल
  5. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही थेट, वेगवान आणि अचूक निकाल कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणावरुन पाहू शकाल.

धाकधूक वाढली!

निकालाला अवघे काही क्षण आता शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. दुपारी एक वाजता निकाल जाहीर केले जातील. त्यानंतर दुपारी चार वाजता निकालांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी बसले होते, हे जाणून घेऊयात..

सायन्स : 6लाख 32 हजार 994

आर्ट्स : 4 लाख 37 हजार 336

कॉमर्स : 3 लाख 64 हजार 362

व्यावसायिक अभ्यासक्रम : 50 हजार 202

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.