AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC NET 2022: UGC NET अभ्यासक्रम जारी! मागील परीक्षांचे पेपर, नवीन अभ्यासक्रम सगळं एका क्लिकवर

विषयनिहाय टॉपिक्स देण्यात आले आहेत. या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता.

UGC NET 2022: UGC NET अभ्यासक्रम जारी! मागील परीक्षांचे पेपर, नवीन अभ्यासक्रम सगळं एका क्लिकवर
GATE PreparationImage Credit source: istockphoto.com
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 29, 2022 | 9:11 AM
Share

विद्यापीठ अनुदान आयोगाची (University Grant Commission) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Entrance Test) सुरू होणार आहे. UGC NET परीक्षा 2022 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) द्वारे घेतली जात आहे. दोन फेज म्हणजे NET डिसेंबर 2021 आणि NET जून 2022 परीक्षा (UGC NET परीक्षा 2022) एकाच वेळी घेतल्या जात आहेत. NET परीक्षा 08 जुलै 2022 पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 14 ऑगस्ट 2022 पर्यंत चालणार आहे. NTA ने UGC NET अभ्यासक्रम देखील जारी केला आहे. यामध्ये विषयनिहाय टॉपिक्स देण्यात आले आहेत. या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता.

एकूण 102 विषयांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध

UGC ने NET पेपर-1 आणि पेपर-2 या दोन्हींसाठी अभ्यासक्रम जारी केला आहे. पेपर-1 चा अभ्यासक्रम म्हणजेच UGC NET सामान्य पेपर 2 मध्ये वेगवेगळे विषय आहेत जे उमेदवाराकडून निवडले जातात. याअंतर्गत एकूण 102 विषयांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. तुम्ही नेट परीक्षेसाठी कोणत्याही विषयासाठी अर्ज केला आहे, तुम्ही या बातमीत दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्याचा अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता. UGC NET च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपण त्यांना डाउनलोड देखील करू शकता.

अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

UGC NET परीक्षेची तारीख 2022

यूजीसी नेट परीक्षेची तारीख दोन दिवस अगोदर जाहीर करण्यात आलीये. त्यानुसार, पहिली UGC NET डिसेंबर 2021 परीक्षा जुलैमध्ये पूर्ण होईल. या परीक्षा 08, 09, 11, 12 जुलै 2022 रोजी होणार आहेत. त्यानंतर यूजीसी नेट जून २०२२ ची परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यानंतर NTA NET या ugcnet.nta.nic.in या वेबसाइटवर नोटीस जारी करण्यात आली. परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

UGC NET प्रवेशपत्र 2022 कधी येईल?

आता उमेदवार UGC NET प्रवेशपत्राची वाट पाहत आहेत. NET परीक्षेचे प्रवेशपत्र NTA लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे. अहवालानुसार, या आठवड्यात NTA NET Admit Card 2022 (NTA NET Admit Card) जारी करेल. तुमचा UGC NET रोल नंबर आणि पासवर्डच्या मदतीने तुम्ही अधिकृत वेबसाइट nta.ac.in किंवा ugcnet.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?