UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

यूजीसी नेट 2021 (UGC NET 2021) परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, जाणून घ्या संपूर्ण माहिती
UGC NET वेबसाईट फोटो
Yuvraj Jadhav

|

Mar 04, 2021 | 3:01 PM

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या यूजीसी नेट 2021 (UGC NET 2021) परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 9 मार्चपर्यंत लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन यूजीसी आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे करण्यात आले आहे. ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 मार्च असून रात्री 11.50 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. (UGC net exam application forms date extended to 9 march)

परीक्षा शुल्क भरण्यासही मुदतवाढ

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) नेट परीक्षेची फी भरण्याची मुदत देखील वाढवली आहे. परीक्षेचे शुल्क भरण्याची अंतिम मुदत 12 मार्च रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जात दुरुस्ती करण्याची मुदत 16 मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय.

मे महिन्यात परीक्षा

UGC NET 2021 परीक्षा देण्यासाठी आधी अर्ज करावा लागेल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. तसेच, केलेल्या अर्जामध्ये सुधारणा करायची असेल तर 5 ते 9 मार्चपर्यंत वेळ दिलेला आहे. या कालवाधीत उमेदवाराच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास दुरुस्ती करता येईल. त्यानंतर अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. यूजीसी नेट परीक्षा (UGC NET 2021) मे महिन्यातील 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 तारखेला आयोजित केली जाणार आहे. तसेच डिसेंबर 2020 महिन्यातील यूजीसी नेटची परीक्षा कोरोनामुळे लांबली होती. ती आता 2021 च्या मे महिन्यात घेतली जाईल.

UGC NET Exam काय आहे?

देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती (Junior Research Fellowship) आणि सहाय्यक प्राध्यापक (Asisstant Professor) पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC) नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्टचे (NET) आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, 2020 साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले.

अर्ज कसा कराल?

UCG NET ची परीक्षा द्यायची असेल तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ugcnet.nta.ac.in या वेबसाईटवर जाऊन New Registration या ऑप्शनवर क्लिक करुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. यावेळी मोबाईल नंबर आणि ईमेलच्या मदतीने रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग यूजीसी नेटची परीक्षा देण्यासाठी अर्ज करता येईल. हा अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे. आर्थिक मागास प्रवर्गासाठी 500 रुपये तर मागासवर्गीय आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क असेल.

संबंधित बातम्या :

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Government Job: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1 लाख रुपये

(UGC net exam application forms date extended to 9 march)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें