AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC CSE मुख्य परीक्षा 2025 साठी नोंदणी सुरू; अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जून

नागरी सेवा क्षेत्रात (IAS, IPS, IFS) करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.(UPSC) ने सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा (Prelims) यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे, त्यांनी आता UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मुख्य परीक्षेसाठी आपला अर्ज भरणे आवश्यक आहे. मग अर्ज कसा करावा, अर्जाची अंतिम तारीख काय आहे, आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

UPSC CSE मुख्य परीक्षा 2025 साठी नोंदणी सुरू; अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जून
UpscImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jun 19, 2025 | 4:44 PM
Share

प्रशासकीय सेवांमध्ये (IAS, IPS, IFS) जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) ने नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 (UPSC CSE Mains Exam 2025) साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार पूर्वपरीक्षा (Prelims) पास झाले आहेत, त्यांनी आता मुख्य परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर २५ जून २०२५ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

१४,१६१ उमेदवारांनी पूर्व परीक्षा पास केली

२५ मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या UPSC च्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून एकूण १४,१६१ उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत. आता या सर्व पात्र उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

मुख्य परीक्षा कधी होणार?

UPSC च्या अधिकृत परीक्षापत्रकानुसार, सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून ती २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालेल. ही परीक्षा विविध केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षेच्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.

अर्ज शुल्क किती लागणार?

सामान्य प्रवर्ग आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹200 निश्चित करण्यात आलं आहे. मात्र महिलांसाठी, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी (PwBD) अर्ज पूर्णपणे मोफत आहे. शुल्काचे पेमेंट ऑनलाइन मोडद्वारे करता येईल.

विशेष गरजा असणाऱ्यांसाठी सूचना:

ज्या उमेदवारांना परीक्षेदरम्यान लेखक (scribe), मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका किंवा अन्य कोणतीही सहाय्यक सुविधा आवश्यक आहे, त्यांनी ती माहिती अर्जात स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. यामुळे आयोग त्या उमेदवारांसाठी योग्य व्यवस्था करू शकतो.

नावातील बदलासंदर्भातील सूचना:

ज्या उमेदवारांचे नाव मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रापेक्षा वेगळे आहे किंवा ज्यांनी अलीकडे नाव बदलले आहे, त्यांनी अर्ज करताना गॅझेट नोटिफिकेशन किंवा इतर अधिकृत कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज अमान्य होऊ शकतो.

मदतीसाठी संपर्क:

अर्ज प्रक्रियेबाबत कुठलीही शंका असल्यास, उमेदवार UPSC च्या नवी दिल्ली येथील शाहजहाँ रोडवरील ‘सुविधा काउंटर’ला सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देऊ शकतात. त्याशिवाय, आयोगाच्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावरूनही मदत घेता येते.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.