Mumbai Lok Sabha Results : मुंबई लोकसभा निकाल 2019

मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो. उत्तर मुंबई लोकसभा निकाल – North Mumbai Lok Sabha Results : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.32 टक्के मतदानाची […]

Mumbai Lok Sabha Results : मुंबई लोकसभा निकाल 2019
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो.

उत्तर मुंबई लोकसभा निकाल – North Mumbai Lok Sabha Results : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.32 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात फाईट झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनागोपाळ शेट्टी (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीउर्मिला मातोंडकर (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरपराभूत

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निकाल – North West Mumbai Lok Sabha Results :उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 54.71 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यात लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनागजानन कीर्तिकर (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसंजय निरुपम (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरपराभूत

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा निकाल – North East Mumbai Lok Sabha Results : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 57.15 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 6 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतदान वाढल्यानं धाकधूक वाढली. वाढलेला मतदार कोणाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या मतदारसंघात भाजपकडून मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दिना पाटील या दोघांमध्येच प्रमुख लढत झाली. मनसेनं उमेदवारी दिली नसल्यानं यावेळी इथं दुहेरी लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनामनोज कोटक (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसंजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
अपक्ष/इतरसंभाजी शिवाजी काशीद (VBA)

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल – North Central Lok Sabha Results : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 53 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भाजपकडून पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात लढत झाली. प्रिया दत्त यांनी सुरुवातीला निवडणूक लढण्यास नकार दिला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना निवडणूक लढवण्यास सांगितल्याने त्या मैदानात उतरल्या.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना पूनम महाजन (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीप्रिया दत्त (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरपराभूत

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निकाल – South Central Lok Sabha Results :दक्ष‍िण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे सुमारे 55.35 टक्के मतदानाची नोंद झाली. शिवसेनेकडून राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यात यंदा लढत झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी दोन वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाराहुल शेवाळे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीएकनाथ गायकवाड (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरडॉ. संजय भोसले (VBA)पराभूत

दक्षिण मुंबई लोकसभा निकाल – South Mumbai Lok Sabha Results :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसकडून मिलिंद देवरा अशी लढत पाहायला मिळाली. दक्षिण मुंबई हा उच्चभ्रू परिसर आहे.  यामध्ये वरळी, मलबार हिलसह 6 विधानसभांचा समावेश आहे. वरळी, शिवडीमध्ये शिवसेना, मलाबार हिल, कुलाबामध्ये भाजप, मुंबादेवीमधून काँग्रेस तर भायखळामधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा आमदार आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाअरविंद सावंत (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीमिलिंद देवरा (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरडॉ. अनिल कुमार (VBA)पराभूत
Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.