Pune Lok Sabha Results : पुणे लोकसभा निकाल 2019

Pune Lok Sabha Results : पुणे लोकसभा निकाल 2019

पुणे जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ येतात. यात पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ अशा चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी मावळ मतदारसंघातील निम्मा भाग रायगड जिल्ह्यात मोडतो.

पुणे लोकसभा निकाल – Pune Lok Sabha Results :पुणे लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 49.84 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 54.14 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 5 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप महायुतीकडून गिरीश बापट, तर काँग्रेस आघाडीकडून मोहन जोशी यांच्यातच प्रमुख लढत झाली.

पुणे लोकसभा निकाल

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरअनिल जाधव (VBA)पराभूत
भाजप/शिवसेनागिरीश बापट (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीमोहन जोशी (काँग्रेस)पराभूत

बारामती लोकसभा निकाल – Baramati Lok Sabha Results :बारामती लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झालं. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपकडून कांचन कूल यांच्यात लढत झाली.बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार करत भाजपनं प्रचंड मोठी यंत्रणा बारामती मतदारसंघात कामाला लावत राष्ट्रवादीला पर्यायानं पवार कुटुंबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

बारामती लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत 21 लाख 12 हजार 408    मतदारांपैकी 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील निवडणुकीत 58.83 टक्के मतदान झालं होतं, त्या तुलनेत यावेळी 61.53 टक्के इतकं मतदान झालं.

बारामती लोकसभा निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाकांचन कुल (भाजप)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)विजयी
अपक्ष/इतरनवनाथ पडळकर (VBA)पराभूत

शिरुर लोकसभा निकाल – Shirur Lok Sabha Results :शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.46 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात शिवसेने-भाजप युतीकडून शिवाजी आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस महाआघाडीकडून नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले अभिनेता डॉ.अमोल कोल्हे आणि बहुजन वंचित आघाडीकडून राहुल ओव्हळ यांच्यात लढत झाली.

शिरुर लोकसभा निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाशिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीअमोल कोल्हे (राष्ट्रवादी)विजयी
अपक्ष/इतरपराभूत

मावळ लोकसभा मतदारसंघ – Maval Lok Sabha Constituency : मावळमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार तर वंचित बहुजन आघाडीकडून राजाराम पाटील यांच्यात तिहेरी लढत झाली.

मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी घटला. 

शिरुर लोकसभा निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाश्रीरंग बारणे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीपार्थ पवार (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरराजाराम पाटील (VBA)पराभूत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI