AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll Result 2022 Date : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला, अपडेटस् कुठं पाहणार?

Exit Poll Result 2022 Date and Time: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला (Exit Poll date) उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जारी होतील.

Exit Poll Result 2022 Date : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला, अपडेटस् कुठं पाहणार?
पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चलाImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 05, 2022 | 5:10 PM
Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2022) रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलीय. उत्तर प्रदेश वगळता पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील मतदान पार पडलं आहे. उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर टीव्ही 9 नेटवर्ककडून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय या संदर्भातील एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात येणार आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठी वर एक्झिट पोल पाहू शकता. टीव्ही 9 मराठीची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्झिट पोलचे अपडेट पाहता येतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला (Exit Poll date) उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जारी होतील.

एक्झिट पोलचे अपडेट कुठं पाहणार?

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतदार काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टी या पैकी कोणत्या पक्षाला कौल देणार याचा कल एक्झिट पोलमधून पाहायला मिळेल. पाच राज्यातील सत्ता कोणत्या पक्षांकडे जाणार याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येणार आहे. एक्झिट पोलचे सर्व अपडेट टीव्ही 9 मराठी आणि www.tv9marathi.com वेबसाईटवर पाहायला मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या सोशल मीडिया प्लॅट फॉर्मवर देखील अपडेट पाहायला मिळतील.

मतदान कसं पार पडलं?

गोवा आणि उत्तराखंड राज्यातील मतदान 14 फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात पार पडलं. पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. मणिपूर राज्यात 27 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान पार पडत आहे.

उत्‍तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात मतदान

पाच राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 7 टप्पे करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी , 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च रोजी मतदान पार पडलं आहे. आता 07 मार्चला सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

10 मार्चला निकाल

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी 7 मार्चला सायंकाळी एक्झिट पोल पाहता येणार आहे.उत्तर प्रदेशमध्ये 406, पंजाब 117, गोवा 40, उत्तराखंडमध्ये 70, मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत.

इतर बातम्या:

Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज

Manipur Election : मणिपूरमध्ये मतदाना दिवशी गोळीबार, एका तरूणाचा मृत्यू; पोलिसांनी गोळी चालवल्याचा भाजपाचा आरोप

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...