
देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर उद्या दि. 4 रोजी सकाळी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होणार की नाही ? हे स्पष्ट होणार आहे. परंतू या अवाढव्य क्षेत्रफळ लाभलेल्या देशाचे नेतृत्व करण्याचे भाग्य कोणाला सर्वाधिक काळ लाभले असे म्हटले तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे नाव पुढे येते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशांचे पुन्हा पंतप्रधान होणार की नाही याचा फैसला काही तासांत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर पंडित नेहरु नंतर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते दुसरे व्यक्ती ठरणार आहेत. परंतू सर्वाधिक कमी काळ राहीलेले पंतप्रधान कोण होते..? यासह आता पर्यंत कोण ? कोण ? किती वेळ या देशाच्या सर्वोच्च शक्तीमान पदावर होते ते पाहूयात…
2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान पदी निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना साल 2019 मध्ये पुन्हा राक्षसी बहुमत मिळत ते या सर्वौच्च पदावर पोहचले आहेत. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राहीलेल्या व्यक्तींमध्ये मोदी चौथ्या क्रमांकावर आहेत. या त्यांच्या नंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दहा महिन्याचा काळ पंतप्रधान पदावर कार्य करण्यात व्यतित केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कारकीर्दीला देखील दहा महिने पूर्ण झाले आहेत. परंतू नरेंद्र मोदी यांची जर पंतप्रधान पदाची हॅट्रीक केली तर ते पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर तिसऱ्यावेळी ते पंतप्रधान होतील असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत केले होते.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे 16 वर्षे 286 इतका काळ या पदावर राहीले. त्यांचा 27 मे 1964 साली मृत्यू झाल्यानंतर या पदावर गुलजारीलाल नंदा आले ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान राहीले. त्यानंतर ‘जय जवान आणि जय किसान’चा नारा देणारे लाल बहादूर शास्री यांची पंतप्रधान पदी निवड झाली. शास्री यांचे 11 जानेवारी 1966 मध्ये रशियातील ताश्कंद येथे निधन झाले. त्यानंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा हे 13 दिवस कार्यवाह पंतप्रधान म्हणून काम पाहीले.
गुलजारीलाल नंदा हे कॉंग्रेसचे नेते होते. ते दोन्ही वेळा अंतरिम पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला होता. गुलजारीलाल नंदा हे अर्थतज्ज्ञ होते. 1921 ते मुंबईच्या नॅशनल कॉलेजात अर्थशास्राचे प्राध्यापक होते. ते मूळचे पाकच्या पंजाबमधील सियालकोटचे हिंदू खत्री परिवारातील होते. महात्मा गांधी यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये स्थलांतर केले. गांधीजी यांच्या असहकार आंदोलनात ते तुरुंगात गेले होते. 1997 साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधी यांची पंतप्रधान पदी नियुक्ती झाली. त्या 11 वर्षे 59 दिवस पंतप्रधान राहील्या त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते 2 वर्षे 126 दिवस पंतप्रधान राहीले. त्यानंतर चौधरी चरण सिंह पंतप्रधान झाले ते 170 दिवसच पंतप्रधान राहीले.
14 जानेवारी 1980 साली पुन्हा इंदिरा गांधी यांची सत्तेत वापसी होत त्या पंतप्रधान झाल्या. 31 ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांची शिख अंगरक्षकांनी हत्या केली. इंदिरा गांधी यांनी एकूण 15 वर्षे 350 दिवस पंतप्रधान पदी होत्या. जवाहलाल नेहरु नंतर सर्वाधिक काळ त्या पंतप्रधान पदी होत्या. त्यानंतर मनमोहन सिंह 10 वर्षे 4 दिवस पंतप्रधान पदावर राहीले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दहा वर्षे पंतप्रधान आहेत. त्यांना पुन्हा संधी मिळाली ते नवा विक्रम करु शकतील. आताच्या आकडेवारी प्रमाणे मनमोहन सिंह यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे 6 वर्षे 80 दिवस पंतप्रधान राहीले आहेत. त्यानंतर राजीव गांधी यांना 5 वर्षे 32 दिवस पंतप्रधान मिळाले. त्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव 4 वर्षे 330 दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर मोरोरजी देसाई यांनी 2 वर्षे 126 दिवस पंतप्रधान पद भोगले. त्यानंतर लालबहादूर शास्री यांना 1 वर्षे 216 दिवस पंतप्रधान पद मिळाले. त्यानंतर व्ही.पी. सिंग यांना 343 दिवस पंतप्रधान पद मिळाले. त्यानंतर एच.डी. देवेगौडा यांना 324 दिवसांचे पंतप्रधान पद मिळाले. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांना 332 दिवसांचे पंतप्रधान पद मिळाले. चंद्र शेखर यांना 223 दिवस पंतप्रधान पद मिळाले तर चरण सिंह यांना सर्वात कमी 170 दिवस पंतप्रधान पदी रहाता आले.
| पंतप्रधानांचे नाव | त्यांचा कार्यकाळ |
|---|---|
| जवाहरलाल नेहरू | 16 वर्षे, 286 दिवस |
| इंदिरा गांधी | 15 वर्षे, 350 दिवस |
| डॉ. मनमोहन सिंह | 10 वर्षे, 4 दिवस |
| नरेंद्र मोदी | 10 वर्षे |
| अटलबिहारी वाजपेयी | 6 वर्षे 80 दिवस |
| राजीव गांधी | 5 वर्षे 32 दिवस |
| पी.व्ही. नरसिंह राव | 4 वर्षे, 330 दिवस |
| मोरारजी देसाई | 2 वर्षे 126 दिवस |
| लाल बहादूर शास्त्री | 1 वर्ष 216 दिवस |
| विश्वनाथ प्रताप सिंग | 343 दिवस |
| एच.डी. देवेगौडा | 324 दिवस |
| इंद्र कुमार गुजराल | 332 दिवस |
| चंद्रशेखर | 223 दिवस |
| चरण सिंग | 170 दिवस |
उत्तरप्रदेशातील जमीन सुधारणा कार्याचे संपूर्ण श्रेय चरण सिंह यांना दिले जाते. चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री म्हणून दोन वेळा कार्य केले. त्यांना उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून मुक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी यांना भारत रत्न पुरस्कार देऊन चरण सिंह यांचा गौरव केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद असो किंवा देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणी केली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू – भगिनींप्रती त्यांचे समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी असल्याने त्यांना भारत रत्न दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.