अरुण गोविल जेथून लढणार त्या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या सर्वाधिक

| Updated on: Mar 25, 2024 | 1:20 AM

भाजप उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने या यादीत १११ उमेदवारांची नावे जाहीर केली. मेरठमधून अरुण गोविल यांना पक्षाने तिकीट दिले आहे. पाहा येथे मुस्लीम मतदारांची संख्या किती

अरुण गोविल जेथून लढणार त्या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या सर्वाधिक
Follow us on

मेरठ-हापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवाराची प्रतीक्षा अखेर संपलीये. भाजपने रविवारी प्रसिद्ध रामायण मालिकेत भगवान श्री रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी या जागेवर हॅट्ट्रिक करणाऱ्या राजेंद्र अग्रवाल यांना या वेळी उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेरठ हापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवाराच्या घोषणेची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा रविवारी संपली. भाजपने अखेर मेरठ-हापूर लोकसभा मतदारसंघासाठीही आपला उमेदवार जाहीर केला आहे.

सलग तीन विजय नोंदवून हॅट्ट्रिक करणाऱ्या राजेंद्र अग्रवाल यांच्या जागी अरुण गोविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अरुण गोविल यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी मेरठ हापूर लोकसभा मतदारसंघासाठी अनेक नावे चर्चेत होती. त्याचवेळी 28 मार्चपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे.

भारतीय जनता पक्षाने आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. जेथून ते निवडणूक लढवणार आहेत तेथे मुस्लीम मतदारांचे वर्चस्व आहे. या जागेवर विजय-पराजय ठरवण्यात या मतदारांचा मोठा वाटा आहे. मेरठ लोकसभा मतदारसंघात दलितांचीही मोठी लोकसंख्या आहे. 2019 च्या आकडेवारीनुसार, मेरठ लोकसभा मतदारसंघात सुमारे 5 लाख 64 हजार मुस्लिमांची लोकसंख्या आहे.

मेरठ लोकसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. 3 लाख, 14 हजार 788 मतदार जाटव समाजाचे तर 58 हजार 700 मतदार वाल्मिकी समाजाचे आहेत. या लोकसभा मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातील मतदारांची संख्या कमी आहे. ब्राह्मण समाजाचे एक लाख 18 हजार लोक येथे आहेत. यानंतर 1 लाख 83 हजार वैश्य, 41 हजार त्यागी समाज, 1 लाख 30 हजार जाट आणि 56 हजार 300 गुर्जर लोकसंख्या आहे.

रामायण मालिकेतील भगवान रामाच्या भूमिकेने अरुण गोविल हे घराघरात प्रसिद्ध झाले. कोविडच्या काळात जेव्हा रामायण पुन्हा प्रसारित झाले, तेव्हा पुन्हा एकदा लोकांनी अरुण गोविल यांना तेच प्रेम दिले.

भारतीय जनता पक्षाने पाचव्या यादीत उत्तर प्रदेशमधील १३ उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून दुसरी संधी दिली असताना, त्यांनी त्यांचे पुत्र आणि पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या जागी जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.