AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोहर पर्रीकर हे संघटन शरण होते, संघटनेची कोणतीचं गोष्ट नाकारली नाही; उत्पलने सुध्दा संघटनेची तत्त्वं पाळावीत: फडणवीस

त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात निवडून यावे, आम्ही पाच वर्षांनी त्यांना पणजीत उमेदवारी देऊ असे त्यांना सांगितले. मी आजच त्यांना शब्द दिला...पण मी म्हणतो तसंच करा असे होणार नाही. त्यांनी समजून घ्यावे, असे करू नये आणि ते करणार नाहीत.

मनोहर पर्रीकर हे संघटन शरण होते, संघटनेची कोणतीचं गोष्ट नाकारली नाही; उत्पलने सुध्दा संघटनेची तत्त्वं पाळावीत: फडणवीस
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस
| Edited By: महेश घोलप | Updated on: Jan 21, 2022 | 6:13 PM
Share

गोवा – गोवा निवडणुकीच्या (GOA ELECTION) पहिल्या यादीत (FIRST LIST) डावलल्यानंतर उत्पल पर्रीकर (UTPAL PARRIKAR) हे कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यातचं “मनोहरभाई पर्रीकर (MANOHAR PARRIKAR)  हेदेखील संघटन शरण होते. संघटनेने एखादी गोष्ट सांगितली तर ती त्यांनी कधी नाकारली नाही. आपण भाजपला विचार आणि तत्व सांगत आहोत. तर भाजपचे (BJP) तत्व देखील आपण मानले पाहिजे, आमची अपेक्षा आहे की याठिकाणी उत्पलनी आम्ही सांगितलेल्या जागांवर विचार केला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

उत्पल पर्रीकर यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. तसेच त्यांनी जाहीर नाराजी देखील बोलून दाखवली होती. त्यामुळे अपक्ष म्हणून लढण्यास उत्पल पर्रीकर सक्षम असल्याची चर्चा गोव्यात आहे. परंतु उत्कल पर्रीकर नेमका निर्णय काय घेणार याकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत.

5 वर्षांनी पणजी मिळेल त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात निवडून यावे, आम्ही पाच वर्षांनी त्यांना पणजीत उमेदवारी देऊ असे त्यांना सांगितले. मी आजच त्यांना शब्द दिला…पण मी म्हणतो तसंच करा असे होणार नाही. त्यांनी समजून घ्यावे, असे करू नये आणि ते करणार नाहीत.

शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना थांबण्याचा आमचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू. कारण मनोहरभाईचा परिवार आमचा परिवार आहे. या पक्षात त्यांचे योगदान आहे, पक्षाने त्यांना दिले आहे…हे एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्य ऐकत नसला तरी समजवणे ही आमची जबाबदारी आहे.

पणजीतून भाजपच्या या नेत्याला उमेदवारी सरकार स्थिर करायचे होते त्यावेळी बाबुश पक्षात आले. ते पोटनिवडणुकीत निवडून आले होते.आणि अशा या परिस्थितीत आपण जी कमीटमेंट दिली त्यापासून दूर जाता येणार नाही. पक्षाची अडचण उत्पल यांनी समजून घ्यावी.

हा पक्ष काँग्रेससाठी डोकेदुखी तृणमूल आमच्यासाठी नाही तर कांग्रेससाठी डोकेदुखी आहे. आणि सगळ्यात जास्त गोव्यासाठी डोकेदुखी आहे. तृणमूल पक्ष ज्या वेगाने गोव्यात वर त्याच वेगाने खाली आला आहे. आणि तो बुडता बुडता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षालाही बुडवणार आहे.

दुस-या जागेचा विचार नाही, माझी भूमिका ठाम आहे; मी पणजीतूनच लढणार

उत्पल पर्रिकरांसाठी जाहीर उमेदवार मागे घेण्याची शिवसेनेची तयारी, आता फडणवीसांचं सविस्तर उत्तर

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? प्रियंका गांधी म्हणाल्या, सगळीकडे मीच तर दिसतेय !

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?