Election Result 2022 Live: पंजाबमधील निकाल काँग्रेसला झटका देणारा, शरद पवार पहिल्यांदाच काँग्रेसवर बोलले, ममतादीदींनाही फटकारले

| Updated on: Mar 10, 2022 | 6:00 PM

Election Result 2022 उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकांचे कल हाती आले आहेत. चार राज्यात भाजपची तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येताना दिसत आहे. या निकालावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना फटकारले आहे.

Election Result 2022 Live: पंजाबमधील निकाल काँग्रेसला झटका देणारा, शरद पवार पहिल्यांदाच काँग्रेसवर बोलले, ममतादीदींनाही फटकारले
पंजाबमधील निकाल काँग्रेसला झटका देणारा, शरद पवार पहिल्यांदाच काँग्रेसवर बोलले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: उत्तर प्रदेशसह (uttar pradesh) पाच राज्यातील निवडणुकांचे कल हाती आले आहेत. चार राज्यात भाजपची तर पंजाबमध्ये काँग्रेसची (congress) सत्ता येताना दिसत आहे. या निकालावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना फटकारले आहे. पंजाबमधील निकाल भाजपला अनुकूल नाही, पण काँग्रेससाठी मोठा झटका आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 2014नंतर पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील पराभवावरून शरद पवार यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. तर, गोव्यातील पराभवावरून पवारांनी ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले आहे. गोव्यात अस्तित्व नसताना ममता बॅनर्जी यांनी उमेदवार दिले. इतर पक्षातील उमेदवारांना घेऊन त्यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे तिथली गणितं बिघडल्याचं पवारांनी म्हटलंय. तसेच किमान समान कार्यक्रमावर सर्व विरोधी पक्षांनी एकत्रं आलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तिथे एक वेगळं चित्रं पाहायला मिळत आहे. पण पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाही. मात्र काँग्रेसला झटका देणारा हा बदल आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी ज्या प्रकारचं यश संपादन केलं आणि ज्या प्रकारे प्रशासन सांभाळलं त्याबद्दल दिल्लीच्या लोकांनी त्यांना पावती दिली. पंजाब हे दिल्लीच्या शेजारचं राज्य आहे. त्यामुळे दिल्लीतील कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला. तसेच पंजाब सोडलं तर इतर राज्यात जे पक्ष आहेत. त्यांनाच मतदारांनी समर्थन दिलं आहे. त्यामुळे इतर राज्यात भाजपचं सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे, असं शरद पवार म्हणाले.

तृणमूलवर टीका

गोव्यातील राष्ट्रवादीच्या पराभवाला पवार यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसवर टीका केली. तृणमूलने ऐनवेळी गोव्याच्या निवडणुकीत प्रवेश केला. एकदम सर्व जागा लढवायच्या आणि अन्य पक्षाचे लोक घेऊन जागा लढवायच्या हे जर तृणमूलने टाळलं असतं तर बरं झालं असतं. उदाहणार्थ माझ्या पक्षाचा एकच आमदार होता. चर्चिल हे त्याचं नाव. तृणमूलने गोव्यात लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर पक्षाच्या लोकांना आपल्याकडे घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे चर्चिल त्यांच्या पक्षात गेला. या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या राज्यात स्थान नसताना एखाद्या पक्षाने संबंध सर्वच्या सर्व जागा लढवायच्या आणि तिथल्या स्थानिक आणि अन्य विरोधी पक्षांशी सुसंवाद ठेवायचा नाही याचे दुष्परिणाम होत असतात. त्यांनाच नव्हे तर इतर पक्षांनाही ते सहन करावे लागते, अशा शब्दात पवारांनी तृणमूल काँग्रेसला फटकारले.

अधिवेशना दरम्यान चर्चा

आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन 14 मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पाऊले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितलं.

तो महाराष्ट्र भी तैयार है

भाजपकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला असता ठिक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी यावेळी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या:

Election Result 2022 Live: शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा आठवले भारी, मणिपूरमध्ये रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी

Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशात भाजपाची मुसंडी, महाराष्ट्रातलं ठाकरे सरकारवर संकट? बीएमसीचेही गणित बदलणार?

Elections Result | शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट