महाराष्ट्र अभी बाकी है म्हणणाऱ्यांना महाराष्ट्र तैयार है, शरद पवारांचं प्रतिआव्हान

निवडणूक निकालानंतर राज्यातले भाजप (Bjp) नेतेही ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, चा नारा देऊ लागले आहेत. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र अभी बाकी है म्हणणाऱ्यांना महाराष्ट्र तैयार है, शरद पवारांचं प्रतिआव्हान
शरद पवारांचे भाजपला प्रतिआव्हानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:25 PM

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर (Five State Election result 2022) महाराष्ट्रातूनही आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. निवडणूक निकालानंतर राज्यातले भाजप (Bjp) नेतेही ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, चा नारा देऊ लागले आहेत. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले आहे. महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच आगामी काळात याबाबत चर्चा करता येईल. आगामी अधिवेशनाच्या काळात आम्ही दिल्लीत असू त्यावेळी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करता येईल. यातून मार्ग काढता येईल. आगामी काळात एकत्र येण्याबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असेही पवार आजच्या निकालानंतर म्हणाले आहेत.

काँग्रेसने खचून जाऊ नये

तसचे यावर पुढे बोलताना, पंजाबमध्ये चन्नी यांना मुख्यमंत्री करणे हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. अशी स्थिती राजकीय जीवनात येत असते. 1977 लाही अशीच परिस्थिती आली होती. सर्वच राज्यात काँग्रेस हारली होती. तेव्हा अनेक लोक बोलले की काँग्रेस संपली आहे. मात्र काँग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली. राजकारणात पक्ष कधी ना कधी हारतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही. असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच गोव्यात काँग्रेसची ही स्थिती बदलणार याची मला खात्री आहे, असेही पवार म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

पंजाबमधील मोठ्या विजयानंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हुनुमानाच्या दर्शनाला पोहोचल्याचे दिसून आले. पंजाबमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का देत आम आदमी पार्टीतने एकहाती आपलं बस्तानं बसवलं आहे.

पंजाबच्या निकालाबाबत काय म्हणाले?

पंजाबमधील निकालाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, देशात एवढं मोठं शेतकरी आंदोलन झालं. त्यात सर्वात जास्त शेतकरी हे पंजाबमधील होते. काही लोकांनी तिथल्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटलं. देशासाठी बलिदान देणाऱ्यांमध्ये शीख बांधवाचा सहभाग मोठा आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांविषयी अशी पाऊलं उचलली जाऊ नयेत. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ठोस पाऊलं उचलनं गरजेचं आहे. त्यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांनी आम आदमी पार्टीला कौल दिला असावा, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. तसेच एव्हीएमबाबत मी काही बोलणार नाही. काही लोकांच्या तक्रारी निश्चित आहेत. मात्र जिंकल्यानंतर याबाबत तक्रारी नसतात. म्हणून मी आज ते कारण आहे पराभवाचं असे मान्य करत नाही. असे पवार म्हणाले.

Uttarakhand Assembly Election 2022: मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्री बदलावे लागले तरी काँग्रेसला नाही जमले, मोदींनी उत्तराखंड कसे …

Punjab Assembly Elections 2022: पंजाबमध्ये काँग्रेसचं पानिपत, सिद्धूचं पहिलं ट्वीट!

गोव्यात जे पर्रिकर, गडकरींना नाही जमलं ते फडणवीसांनी करुन दाखवलं! महाराष्ट्रात जोर वाढणार?

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.