AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारे थलपती विजय किती शिकले? तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण अभिनेते विजय थलपती यांनी मोठी बाजी मारली आहे. पण त्यांचं शिक्षण किती झालं आहे. याबद्दल कोणाला माहिती नाही. त्यांच्या शिक्षणाबद्दल तुम्हालाही वाटेल...

Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारे थलपती विजय किती शिकले? तुम्हालाही वाटेल आश्चर्य
सुपरस्टार थलपती विजय
| Updated on: May 04, 2026 | 1:20 PM
Share

Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणातील आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि हा दिवस पुढचे अनेक वर्ष विसरु शकत नाही. अभिनेत्यापासून जननेते झालेल्या सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांचीच सर्वत्र चर्चा आहे. तब्बल 35 वर्षांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल करुन दाखवणारा विजय हे पहिले अभिनेते आहे. विजय यांनी ‘तामिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) नावाचा नवीन पक्ष स्थापन केला असून, निवडणुकीत भक्कम आघाडी घेऊन सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत ते आधीच आहेत. ते राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीही बनू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही.

आज राजकारणात मोठे बदल घडवणाऱ्या विजय यांच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहे. लोकांना त्यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. पण त्यांच्याबद्दल अनेक रोमांचक तथ्य समोर येत आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, थलपती विजय कॉलेजमधील ड्रॉपआउट विद्यार्थी होते. त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षण मध्येच सोडून दिलं… त्यानंतर त्यांनी कधीच स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला नाही.

विजय यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण चेन्नईमध्ये झालं असलं तरी, पुढील शिक्षणासाठी त्यांनी नंतर लॉयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशन कोर्सला प्रवेश घेतला. पण, अभ्यासापेक्षा अभिनयात त्यांना अधिक रस होता, ज्यामुळे त्यांनी शिक्षण सोडून अभिनयाला पूर्णवेळ करिअर म्हणून निवडलं. आज ते देशभरात एक सुपरस्टार म्हणून ओळखले जातात

निवडणुकीच्या आधी अभिनयाला ठोकला राम राम…

तामिळनाडूच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी विजय यांनी 33 वर्षांच्या अभिनय करियरचा निरोप घेतला. त्यांनी म्हटलं होतं की, ‘राजकारणात उतरायचं आहे तर, माझं संपूर्ण फोकस राजकारणात करायचं आहे.’, त्यांच्या एकाग्रतेने आणि समर्पणाने त्यांना आज तामिळनाडूच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनवलं आहे. ते एकहाती सरकार स्थापन करून आपल्या पहिल्याच कार्यकाळात राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी दाट शक्यता आहे.  सांगायचं झालं तर, 2024 मध्ये विजय यांनी अभिनय विश्वातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. पण आता सर्वांच्या नजरा विजय यांच्या निकालाकडे येऊन थांबल्या आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी