
राज्यातील सर्वात बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पाडली. राज्यातील जवळपास 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. आज, 16 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून निकालाचे अपडेट समोर येत आहेत. आतापर्यंत समोर आलेले आकडे पाहाता मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या निकालात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदें शिवसेनेला पछाडलं असल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी उचललेले एक पाऊस त्यांच्यासाठी फायद्याचे ठरले आहे.
ती खेळी कोणती?
Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका...
Maharashtra Municipal Election Results 2026 : भाजपाचा गड गेला, मोठी खळबळ...
Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 166, 73 चा निकाल काय?
Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 147, चारचा निकाल काय?
Pune Mahapalika Election Results : राष्ट्रवादीच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांचा मतमोजणीवर आक्षेप
Sangli Election Results 2026 : कुपवाडच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भाजप शहर जिल्हाध्यक्ष पराभूत
एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक आपल्या बाजूने केले होते. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला कमकुवत करण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. मात्र, मुंबईतील आपली सत्ता कमकुवत होताना पाहून उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी केली. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी केली. ठाकरे बंधूंच्या या यूतीचा उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काय आहे आकडेवारी?
आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांवरुन उद्धव ठाकरे यांची शिवसेना सरस ठरत असल्याचे चित्र आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची 51 जागांवर आघाडी दिसत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 20 जागांवर आघाडी आल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच मुंबईत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पछाडलं असल्याचे समोर आले आहे. तर मनसेच्या 7 जागांवर आघाडी असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंतचा निकाल काय?
मुंबईची आकडेवारी
भाजप- 57
शिवसेना- 20
शिवसेना UBT : 58
काँग्रेस : 09
मनसे- 7
राष्ट्रवादी-01
इतर-05
भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट एकत्रितपणे 83 जागांवर आघाडीवर आहेत. यामुळे मुंबईतील स्थानिक राजकारणात महायुतीची ताकद स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) 60 जागांवर आघाडीवर असून, महायुतीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. काँग्रेसच्या 10 जागा आल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) 1 जागेवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजी नगरची आकडेवारी
भाजप : 10
शिवसेना : 08
शिवसेना UBT : 04
एमआयएम : 07
काँग्रेस : 01
राष्ट्रवादी दादा: 02
राष्ट्रवादी SP: 00
चंद्रपूरची आकडेवारी
भाजप – 8
शिवसेना – 2
राष्ट्रवादी – 1
काँग्रेस – 9
शिवसेना उद्धव – 4
राष्ट्रवादी शरद पवार –
मनसे –
वंचित – 2
एमआयएम – 2
अपक्ष – 4