UP Assembly Election: उत्तर प्रदेशात शिवसेना इतक्या जागा लढणार ? संजय राऊतांनी केलं स्पष्ट

| Updated on: Jan 14, 2022 | 11:52 AM

शिवसेना युपीमध्ये 50 जागा लढणार आहे. प्रत्येक विभागात आमचे उमेदवार असतील, तसेच आमची पुढच्या निवडणुकीची ही तयारी आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं आहे.

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात शिवसेना इतक्या जागा लढणार ? संजय राऊतांनी केलं स्पष्ट
संजय राऊत
Follow us on

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात शिवसेना इतक्या जागा लढणार ? संजय राऊतांनी केलं स्पष्ट

पाच राज्यांच्या निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यापासून उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र आहे. युपीमध्ये शिवसेना (shivsena) विधानसभेच्या काही जागांवर निवडणुक लढण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना युपीमध्ये 50 जागा लढणार आहे. प्रत्येक विभागात आमचे उमेदवार असतील, तसेच आमची पुढच्या निवडणुकीची ही तयारी आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आयोध्येमधून निवडणूक लढणार असल्याने त्या विधानसभ क्षेत्राला विशेष महत्त्व प्रात्प झाले आहे. आयोध्येत शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार हेही विशेष आहे. शिवसेनेकडून मथुरेतून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.

गोव्याचं वातावरण हे नेहमी नशेचं असतं. तसेच गोव्याच्या वातावरणाची नशाचं वेगळी असते. काही जणांची यशाची धुंदी अजून पुर्णपणे उतरल्याचं दिसत नाही. गोव्यातलं काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व जमिनीच्या अंतरापासून नेहमी पाच बोट वरती चालत असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित नसल्याने कसलाही फरक पडणार नाही. देशात सर्वाधिक सुरळीत कारभार हा महाराष्ट्रातून चालत असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपच्या नेत्यांनी कालच्या मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत मोठ्या प्रमाणात टीका केली, त्याला उत्तर देताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे सचिवालय याचा खुलासा करेल, तसेच पंतप्रधान सुध्दा अनेक बैठकांना अनुपस्थित असतात. कालच्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. त्यांना भाजप कमी का लेखते असा प्रतिसवाल राऊत यांनी विरोधकांना केला आहे.

निवडणुक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. युपीत सात टप्प्यात मतदात होणार आहे. तसेच पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. युपीत विधानसभा क्षेत्रात असे आहेत सात टप्पे 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा हे टप्पे 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च. युपीच्या निवडणुकीचे निकाल 10 तारखेला जाहीर होतील.

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

UP Assembly Election: अखिलेशच्या नेतृत्वात भाजपच्या विरोधात लढणार शरद पवार

UP Election : ओबीसी नेत्याचं राजीनामा सत्र सुरुच, मित्र पक्षांनी दबाव वाढवला, अमित शाह यांची तातडीची बैठक