AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबो ही कसली क्रेझ, 24 तासात नवीन गाण्याला 34 लाखांहून अधिक व्ह्यूज, पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी

आरे बापरे! ही कसली क्रेझ, 19 वर्षांपूर्वीचं गाणं ज्याच्या नवीन व्हर्जनने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ. प्रदर्शित होताच 24 तासांमध्ये या गाण्याला मिळाले 34 लाख व्ह्यूज. पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड दर्दी.

बाबो ही कसली क्रेझ, 24 तासात नवीन गाण्याला 34 लाखांहून अधिक व्ह्यूज, पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी
| Updated on: Aug 08, 2026 | 2:44 PM
Share

संगीताची ताकदच अशी असते की, एखादी जुनी धून ऐकताच आपण क्षणात भूतकाळात पोहोचतो. जुन्या गाण्यांशी जोडलेल्या आठवणी पुन्हा ताज्या होतात आणि मन भावूक होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जुन्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तेरा मेरा रिश्ता’ या गाण्याच्या नव्या 2.0 व्हर्जनने 2000च्या दशकातील अनेकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका लोकप्रिय क्राइम-ड्रामा चित्रपटातील हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजले होते. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली होती. विशेषतः ‘तेरा मेरा रिश्ता’ हे गाणं त्या काळातील तरुणाईच्या आवडत्या गाण्यांपैकी एक बनले होते.

प्रीतम यांच्या संगीताने गाजलेलं गाणं

या गाण्याचे मूळ संगीत प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी दिले होते, तर हृदयस्पर्शी गीतलेखन सईद कादरी यांनी केले होते. पाकिस्तानी गायक मुस्तफा जाहिद यांच्या आवाजाने या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली.

आता तब्बल 19 वर्षांनंतर या गाण्याचे ‘तेरा मेरा रिश्ता 2.0’ हे नवे रीक्रिएटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मात्र, या नव्या आवृत्तीत मूळ गाण्यापेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत.

यावेळी संगीतकार मिथुन यांनी नव्या गाण्याचे संगीत तयार केले आहे. गीत मात्र पुन्हा एकदा सईद कादरी यांनीच लिहिले आहे. या नव्या आवृत्तीला साज भट्ट आणि सुबोध शर्मा यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजातूनही मूळ गाण्यातील भावनिकता आणि विरहाची भावना जाणवते.

विशेष म्हणजे, नव्या व्हर्जनमध्ये मूळ गाण्याचे संगीतकार प्रीतम आणि गायक मुस्तफा जाहिद यांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या गाण्याची आठवण आणि नव्या संगीताचा ताजेपणा यांचा सुंदर मेळ या गाण्यात पाहायला मिळतो.

24 तासांत 34 लाखांहून अधिक व्ह्यूज

गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. यूट्यूबवर अवघ्या 24 तासांत या गाण्याने 34 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवल्याचे सांगितले जात आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे.

गाण्यावर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत असून, अनेकजण हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकत असल्याचे सांगत आहेत. काही चाहत्यांच्या मते, हे गाणं ऐकताच त्यांना 2000च्या दशकातील जुन्या आठवणी पुन्हा आठवतात.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?