22 वर्षांची तरुणी मृत्यूनंतरही 900 दिवस ‘जिवंत’, अंगावर काटा आणणारी घटना

22 वर्षाची मुलगी मृत्यूनंतर देखील 900 दिवस असते जिवंत, अपहरणकर्त्यांनी तिच्यासोबत जे केलं ते ऐकून अंगावर येईल काटा.

22 वर्षांची तरुणी मृत्यूनंतरही 900 दिवस ‘जिवंत’, अंगावर काटा आणणारी घटना
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 26, 2026 | 6:09 PM

OTT प्लॅटफॉर्मवर खऱ्या घटनांवर आधारित वेब सिरीज आणि डॉक्युमेंट्रींची लोकप्रियता दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालली आहे. प्रेक्षकांना थरार, सस्पेन्स आणि वास्तवाची जोड असलेल्या कथा अधिक आवडताना दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या सत्य घटनेवर आधारित Netflix वरील 900 Days Without Annabel ही डॉक्युमेंट्री सध्या चर्चेत आहे.

ही कथा आहे एका 22 वर्षांच्या तरुणीची. जिचे नाव आहे एनाबेल. जी एका पॉश भागात राहत असते. एनाबेल रोजप्रमाणे जॉगिंगसाठी घराबाहेर पडते, मात्र त्या दिवशी ती कधीच परत येत नाही. तिच्या अचानक गायब होण्याने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर हादरून जातो.

अपहरण आणि खंडणीची मागणी

तपासादरम्यान समोर येते की, कैंडिडो ऑर्टिज आणि एमिलियो मुनोज या दोन व्यक्तींनी एनाबेलचे अपहरण केले होते. त्यांनी एनाबेलच्या कुटुंबीयांना तब्बल 14 वेळा फोन करून 9 लाख डॉलर्सची खंडणी मागितली. एवढंच नाही तर त्यांनी कुटुंबीयांना फसवण्यासाठी बनावट ऑडिओ टेपही पाठवले. या टेपमध्ये मुनोजच्या पत्नीने एनाबेलच्या आवाजात किंचाळण्याचे आणि मदत करण्याचे रेकॉर्डिंग केले होते. ज्यामुळे कुटुंबीयांना एनाबेल अजून जिवंत असल्याचा भास होत होता.

या तीन भागांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये पहिल्या भागात अपहरण आणि खंडणीची घटना दाखवण्यात आली आहे. दुसऱ्या भागात पोलिसांची सखोल चौकशी आणि बनावट ऑडिओचा तपास उलगडतो. तर तिसऱ्या आणि अंतिम भागात आरोपींची अटक आणि एनाबेलचा मृतदेह सापडण्याचा थरारक शेवट दाखवला आहे.

शेवटच्या भागाचे प्रेक्षकांकडून कौतुक

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अपहरणानंतर लगेचच एनाबेलची हत्या करण्यात आली होती. मात्र आरोपींनी तब्बल 900 दिवस तिच्या मृतदेहाचा आधार घेत कुटुंबीयांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. एनाबेलचा मृतदेह एका ओसाड कारखान्यात इतके दिवस पडून होता.

ही घटना 1995 मधीलअसून 2024 मध्ये यावर आधारित ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली. IMDb वर या सिरीजला 10 पैकी 6 रेटिंग मिळाले आहे. यातील सस्पेन्स आणि शेवटच्या भागाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. मन सुन्न करणारी आणि अंगावर शहारे आणणारी ही सत्यकथा एकदा पाहिल्यानंतर तिला विसरणे कठीण होते.

Follow Us