24 वर्षांपूर्वीचं गाणं आजही लग्नसोहळे गाजवतंय; गोविंदा-राणीचा नखरेल रोमँस, सोनू निगम-अलका यांचा मधुर आवाज

24 वर्षांपूर्वी आलेलं गोविंदा आणि राणी मुखर्जी यांचं एक गाणं आजही लग्नसमारंभात मोठ्या उत्साहात वाजवलं जातं. सोनू निगम आणि अलका याग्निक यांच्या आवाजातील या गाण्यावर नवरदेवही आपल्या नवरीला इम्प्रेस करण्यासाठी डान्स करतात. नेमकं कोणतं आहे हे गाणं आणि आजही त्याची क्रेझ कायम का आहे?

24 वर्षांपूर्वीचं गाणं आजही लग्नसोहळे गाजवतंय; गोविंदा-राणीचा नखरेल रोमँस, सोनू निगम-अलका यांचा मधुर आवाज
popular bollywood song
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 24, 2026 | 12:25 AM

लग्नात नवरा-बायकोची एंट्री असो किंवा हळदीच्या कार्यक्रमात डान्स, काही गाणी अशी असतात की ती वाजली की आपोआप पाय थिरकायला लागतात. आज डीजेवर नवनवीन गाणी वाजत असली तरी जुन्या गाण्यांची जागा काही कमी झालेली नाही. असंच एक गाणं गेल्या 24 वर्षांपासून लग्नसमारंभात वाजतंय. विशेष म्हणजे, हे गाणं अनेकदा नवरदेव आपल्या नवरीला इम्प्रेस करण्यासाठीही वापरतो. गोविंदा आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे.

गोविंदा-राणीचं गाणं आजही लोकप्रिय

2002 मध्ये आलेल्या ‘चलो इश्क लड़ाएं’ या चित्रपटातील ‘तुझको ही दुल्हन बनाऊंगा’ हे गाणं आजही लग्नात ऐकायला मिळतं. सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेल्या या गाण्यात गोविंदा राणी मुखर्जीला आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसतो. तिचे नखरे, गोविंदाची मजेशीर स्टाइल आणि दोघांची केमिस्ट्री यामुळे हे गाणं प्रेक्षकांना आवडलं होतं.

Loading...

आजही लग्नात हे गाणं वाजलं की अनेकजण त्यावर डान्स करतात. काही ठिकाणी तर नवरदेव नवरीला उद्देशून हे गाणं गाताना किंवा डान्स करताना दिसतो. त्यामुळे 24 वर्षांपूर्वी आलेलं हे गाणं आजही लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये तितकंच लोकप्रिय आहे.

चित्रपटाची कथाही होती मजेशीर

‘चलो इश्क लड़ाएं’ चित्रपटात गोविंदा आणि राणी मुखर्जी यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. राणीची व्यक्तिरेखा नशेच्या आहारी गेलेली असते. गाडी चालवताना तिची गोविंदाशी टक्कर होते. गोविंदा तिचा चाहता असतो आणि या भेटीनंतर दोघांच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग घडत जातात. यातूनच त्यांचं प्रेम फुलतं.

 

 

चित्रपटात एकूण 6 गाणी होती. मात्र, ‘तुझको ही दुल्हन बनाऊंगा’ हे गाणं विशेष गाजलं. सोनू निगम आणि अलका याग्निक यांचा आवाज, हिमेश रेशमियाचं संगीत आणि गोविंदा-राणीचा रोमँस यामुळे हे गाणं आजही जुनं झालेलं नाही. लग्नाच्या गाण्यांमध्ये आजही त्याचा समावेश केला जातो.

गाण्याचे बोल

तुझको ही, तुझको ही

तुझको ही दुल्हन बनाऊँगा

वरना कुंवारा मर जाऊंगा

जाके जोगन बन जाऊंगी

संग तेरे मैं ना आऊंगी

सब से मैं यह कह जाऊंगी

तुझको ना दूल्हा बनाऊंगी

चाहे कुंवारी मर जाऊंगी

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us