AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

32 वर्षांपासून प्रत्येक ऑटो ड्रायव्हरचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच सर्वच गुणगुणतात

32 वर्षांपासून गोविंदाचं हे गाणं प्रत्येक ऑटो ड्रायव्हरचं आहे आवडतं. राहत इंदौरी यांचे शब्द आणि कुमार सानू यांच्या सुंदर आवाजामुळे आजही अनेक ऑटोमध्ये ऐकायला मिळतं.

32 वर्षांपासून प्रत्येक ऑटो ड्रायव्हरचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच सर्वच गुणगुणतात
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 01, 2026 | 8:34 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक दिग्गज शायर आणि गीतकारांनी अविस्मरणीय गाणी दिली आहेत. यातील काही गाणी काळाच्या पुढे जाऊन आजही प्रेक्षकांच्या आणि संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरतात. असंच एक एव्हरग्रीन गाणं म्हणजे 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या गोविंदाच्या ‘खुद्दार’ चित्रपटातील ‘तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है’.

या लोकप्रिय गाण्याचे बोल प्रसिद्ध उर्दू शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांनी लिहिले होते. आपल्या दमदार शायरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राहत इंदौरी यांनी प्रेम आणि प्रिय व्यक्तीच्या सौंदर्याचं कौतुक करणारे सुंदर शब्द या गाण्यातून मांडले. त्यामुळे हे गाणं आजही 90 च्या दशकातील रोमँटिक गाण्यांमध्ये आवर्जून ऐकलं जातं.

गाण्यावर बनलेत लाखो रील्स

या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिलं असून कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी आपल्या सुरेल आवाजात ते गायलं आहे. 90 च्या दशकातील हे रोमँटिक गाणं आजही अनेक संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतं. सोशल मीडियावरील रील्सपासून ते जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमांपर्यंत या गाण्याची लोकप्रियता कायम असल्याचं पाहायला मिळतं.

‘खुद्दार’ चित्रपटात गोविंदासोबत करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होती. इक्बाल दुर्रानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात कादर खान, शक्ती कपूर, श्रीराम लागू यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

आजही या गाण्याची प्रचंड क्रेझ

राहत इंदौरी यांनी केवळ ‘तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है’च नाही, तर ‘नींद चुराई मेरी’, ‘चोरी चोरी जब नजरें मिलीं’, ‘दिल को हजार बार रोका’, ‘ऐं बोले तो’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कोई जाए तो ले आए’ यांसारखी लोकप्रिय गाणीही लिहिली. त्यांच्या शब्दांना संगीताची सुरेख साथ मिळाल्यामुळे त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या लक्षात आहेत.

विशेष म्हणजे, काळ बदलला, संगीताच्या आवडी बदलल्या आणि गाण्यांच्या सादरीकरणाची माध्यमंही बदलली; मात्र राहत इंदौरींच्या शब्दांमधील प्रेमाची भावना आजही तितकीच ताजी वाटते. त्यामुळेच ‘तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है’ हे गाणं आजही 90 च्या दशकातील संगीताची आठवण करून देत रसिकांच्या मनात घर करून आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी