AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुसलेल्या बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी सर्वात सुंदर गाणं, 34 वर्षांपासून लोकप्रिय, ऐकताच जातो रुसवा

34 वर्षांपासून नाराज झालेल्या बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी खास ठरलं आहे हे गाणं. उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजामुळे आजही अनेकांचं आवडतं.

रुसलेल्या बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी सर्वात सुंदर गाणं, 34 वर्षांपासून लोकप्रिय, ऐकताच जातो रुसवा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 12, 2026 | 2:14 PM
Share

90 चं दशक बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांसाठी खास ओळखलं जातं. या काळात अनेक अशी गाणी तयार झाली, जी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. गायक उदित नारायण यांच्या सुमधुर आवाजातील असंच एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘मेरे दिल को करार आ जाए’. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ या चित्रपटातील हे गाणं आजही प्रेमीयुगुलांच्या पसंतीस उतरलं आहे.

‘मेरे दिल को करार आ जाए’ या रोमँटिक गाण्यात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची जोडी पाहायला मिळाली होती. गाण्यातील दोघांची केमिस्ट्री आणि प्रेम व्यक्त करण्याची सुंदर शैली प्रेक्षकांना भावली. रुसलेल्या प्रियकराची समजूत काढताना आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याने अनेकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांनी त्या काळात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजाची जादू

या गाण्याला उदित नारायण आणि साधना सरगम यांनी आपला सुरेल आवाज दिला आहे. संगीतकार आनंद-मिलिंद यांच्या संगीताने गाण्याला रोमँटिक साज चढवला तर गीतकार समीर यांच्या शब्दांनी प्रेमातील हळुवार भावना सुंदरपणे मांडल्या. गाण्याचं संगीत आणि गायकांचे सूर यांमुळे हे गाणं आजही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांसाठी खास आहे.

‘जिगर’ चित्रपट ठरला होता हिट

‘जिगर’ हा चित्रपट 1992 मध्ये दिवाळीच्या काळात प्रदर्शित झाला होता. फरोग सिद्दीकी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अजय देवगणच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या चित्रपटांपैकी हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. मार्शल आर्ट्स आणि अ‍ॅक्शनचा समावेश असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आज चित्रपटाला 34 वर्षे झाली असली तरी ‘मेरे दिल को करार आ जाए’ या गाण्याची लोकप्रियता आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. जुन्या गाण्यांची आठवण काढताना हे रोमँटिक गाणं आजही अनेकांच्या ओठांवर येतं आणि 90 च्या दशकातील प्रेमळ आठवणींना उजाळा देतं.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी