AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

43 वर्षांचा फ्लॉप अभिनेता, आतापर्यंत दिला फक्त 1 हिट चित्रपट, ज्याने सोन्याचा iPhone ला दिलेला नकार

43 वर्षांचा सर्वात फ्लॉप अभिनेता, ज्याने सोन्याचा iPhone घेण्यास दिला होता नकार. आतापर्यंत दिले 13 चित्रपट. फक्त एकच चित्रपट ठरला सुपरहिट. कोण आहे हा अभिनेता?

43 वर्षांचा फ्लॉप अभिनेता, आतापर्यंत दिला फक्त 1 हिट चित्रपट, ज्याने सोन्याचा iPhone ला दिलेला नकार
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 10, 2026 | 5:46 PM
Share

बॉलिवूडमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तीन सुपरस्टार्सचा दबदबा अनेक दशकांपासून कायम आहे. मात्र, या कलाकारांच्या कुटुंबातील प्रत्येकालाच चित्रपटसृष्टीत यश मिळालं असं नाही. अभिनेता इमरान खान याचं करिअरही याचं उदाहरण आहे. आमिर खानचा भाचा असलेल्या इमरानने 2008 मध्ये ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं.

पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली, मात्र त्यानंतर त्याला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवता आलं नाही. इमरानला ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपटानंतर अचानक मोठ्या रकमेच्या ऑफर्स मिळू लागल्या. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी 7 ते 10 कोटी रुपयांच्या ऑफर्स मिळणं आपल्यासाठी अनपेक्षित होतं, असं त्याने सांगितलं. त्याआधी ‘किडनॅप’ या चित्रपटासाठी त्याला पाच लाख रुपये मिळाले होते, असंही त्याने मुलाखतीत नमूद केलं.

सोन्याचा आयफोन नाकारल्याचा किस्साही सांगितला

या मुलाखतीत इमरानने दुबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमाचा किस्साही सांगितला. दिवसभर मुलाखती देऊन तो थकला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याला लंडनला जायचं होतं. अशा वेळी त्याच्या मॅनेजरने एका मॉलमधील दागिन्यांच्या दुकानाचं उद्घाटन केल्यास त्याला सोन्याचा आयफोन मिळू शकतो, असं सांगितलं. मात्र, इमरानने ही ऑफर नाकारली. त्याला त्या वेळी आराम करायचा होता आणि शांतपणे झोपायचं होतं. या प्रसंगातून त्याने प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या गरजांना महत्त्व दिल्याचं दिसून आलं.

आता इमरान खानच्या कमबॅकची चर्चा

‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातील भूमिकेसाठी इमरानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मात्र, त्यानंतरच्या अनेक चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही. जवळपास दशकभर चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर इमरान पुन्हा मनोरंजनविश्वात परतण्याच्या तयारी करु लागला. वीर दासच्या ‘हॅप्पी पटेल’ या चित्रपटात तो पाहुण्या भूमिकेत दिसला.

एकीकडे आमिर खानचा भाचा अशी ओळख, तर दुसरीकडे स्वतःच्या करिअरमधील चढ-उतारांचा सामना करणारा अभिनेता, असा इमरान खानचा प्रवास राहिला आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक