
Bigg Boss 19: अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 19’ शोमध्ये रोज नवीन तमाशा पाहायला मिळत आहे. आता शोमधील वाद चर्चेत आहेत. स्पर्धकांच्या वादाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शोमध्ये कधी जेवण बनवताना भांडणं होतात, तर कधी स्पर्धकांमध्ये शाब्दीक चकमक होते. शुक्रवारी झालेल्या एपिसोडमध्ये देखील स्पर्धकांमध्ये खटके उडाले… कुनिका सदानंद हिने झिशान कादरी याच्या ताटातून जेवण पुन्हा घेतल्यामुळे वादाला सुरुवात झाली. या प्रकरणात इतर सदस्य देखील सामिल झाले आणि त्यांच्यामध्ये देखील वाद झाले…
शुक्रवारच्या भागात, स्पर्धक एकमेकांशी भांडताना दिसले. वादाला सुवारत नेहल चुडासमा हिने केली. ती म्हणाली की जेव्हा अभिषेक बजाजने फरहाना भट्टला आपल्या कडेवर घेतलं तेव्हा अशनूरने, त्याची मैत्रीण असल्याने, त्याचा निषेध करायला हवा होता शिवाय घरातल्यांनी देखील त्याला काही बोलायला हवं होतं…
टास्क संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी फरहाना भट्ट अभिषेक बजाजवर राग व्यक्त करताना दिसली. नेहल आणि कुनिका तिच्या समर्थनार्थ आल्या आणि त्यांनी घरातील सदस्यांना सांगितलं की ते अभिषेकला पाठिंबा देत आहेत, हे चुकीचे आहे. अभिषेक याच्या वागणुकीमुळे घरातील संपूर्ण वातावरण बिघडून जातं… त्यानंतर तो फरहाना हिला सॉरी म्हणतो… पण ती अभिषेक याच्यावर पुन्हा भडकते… मला कडेवर घ्यायची तुझी हिंमत कशी झाली…
बसीर अली, फरहाना हिच्यासोबत फ्लर्ट करत होता, तर दुसरीकडे स्वयंपाक घरात तान्या आणि कुनिका सासू – सून म्हणून विनोदी अंदाजात जेवण बनवत होत्या. तान्या आणि निलम पुऱ्या करत असताना, झिशान, गौरव, अभिषेक ताटात जेवण घेतात. दरम्यान, कुनिका सर्वांना सांगते, सगळ्यांनी ताटातून पुऱ्या काढा… जास्त पुऱ्या तयार झाल्यानंतर प्रत्येकाने घ्या… पण यावर झिशान भडकतो… आणि याची तक्रार जाऊन कॅप्टन बसीर याच्याकडे करतो… त्यानंतर घरातील वातावरण पुन्हा भयानक होतं…
घरात कुनिका आणि झिशान यांच्यात वाद सुरु असताना, झिशान प्रचंड संतापतो आणि म्हणतो, ‘ती निर्लज्ज आहे. ती प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करते. हे गुरुकुल नाही, आम्हाला लहान मुलांसारखं ती वागवत आहे… मी बाप आहे सर्वांचा… मी तिला इथेच दुरुस्त करेनन. मी स्वतःमध्येच बिग बॉस आहे. नंतर कुनिका भावनिक होते आणि रडू लागते. मग ती झीशानची माफी मागते आणि त्याला जेवण करायला सांगते.
कुनिका जेवत असताना, फरहाना येते आणि म्हणते की तान्या बाहेर गेली आहे आणि काहीतरी वेगळंच बोलत आहे. अमाल मलिक त्यात अडथळा आणतो आणि फरहानाशी भांडू लागतो. अमाल म्हणतो, ‘फरहाना सर्वांना भडकवत आहे. जर दोन लोकांची भांडण होत आहेत तर, ती आपल्यामध्ये संपवायची…’ यावर फरहाना भडकते आणि अमाल याच्यावर ओरडू लागते… एपिसोडच्या शेवटी स्पर्धकांना एक हॅम्पर मिळतं… जे दुबईतून आलेलं असतं.